EXCLUSIVE : Only Agenda-Modi Hate: कॉंग्रेसची गुंडगिरी-भाई जगतापांचा प्रताप! नरेंद्र मोदींवरील अभद्र मीमला उत्तर-अभिनेता रणवीर शौरींना धमकी ; शौरी म्हणाले हा फक्त मोदी-द्वेष

  • बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने मंगळवारी पंतप्रधान मोदींविषयी एक मेमे शेअर करत विरोधकांना लक्ष्य केले होते.

माधवी अग्रवाल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अभद्र मेमेला उत्तर दिल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीला धमकी दिली जात आहे. मंगळवारी त्यांनी ट्विटरवर सूरज ठाकूर नावाच्या व्यक्तीने दिलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. रणवीर शौरी म्हणाले की सूरज ठाकूर काँग्रेसचे एमएलसी भाई जगताप यांच्या सांगण्यावर काम करतो. त्याने मला धमकीचे संदेश पाठवले आहेत. Only Agenda-Modi Hate: Congress’s bullying-Bhai Jagtap’s Gunda ! Actor Ranveer Shourie threatened for answering abusive meme on Narendra Modi; Shourie said it was just Modi-hatred

ज्या ट्वीटसाठी शौरीला धमकी दिली जात आहे ते ट्विट त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरील अभद्र मेमेला उत्तर म्हणून पोस्ट केले होते. त्यांनी पीएम मोदींच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट भेटीचा फोटोचा मेमे शेअर केला आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे कामगार पीएम मोदींना भेटल्यानंतर उत्साहाने भरलेले दिसले, तर काँग्रेसने त्यांना ‘विचारहीन आणि असंवेदनशील’ म्हटले.

यावर भाई जगताप यांच्या गुंडाने रणवीर यांना धमकी दिली होती की त्यांनी लगेच माफी मागावी आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट काढून टाकावी. असे न केल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा म्हणून धमकावले .

कोण आहे सुरज ठाकूर?

सूरज ठाकूर काँग्रेसचे एमएलसी भाई जगताप यांच्या सांगण्यावरून काम करतो. रणवीर शौरी म्हणाले, “सूरज ठाकूर यांनी त्यांना धमकी देत भाई जगताप यांनी आपल्याला पोस्ट केलेले ट्विट डिलीट करण्यास सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की ठाकूर यांनी संदेशात म्हटले होते की तुमच्या ट्विटमुळे करोडो लोकांच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

शौरी म्हणाले

“मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माझा हक्क अबाधित ठेवत धमक्यांना घाबरणार नाही. मी काँग्रेस पक्षाचा समर्थक नाही. भारतीय संविधानाअंतर्गत मला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क मला आहे मी कोणाला घाबरत नाही.”

शौरीने शेअर केला होता मोदींचा फोटो पायाखाली सर्व विपक्ष

रणवीर शौरीने मजेदार मेमे शेअर करत पंतप्रधान मोदींना शिव्या देणाऱ्या ट्रोल्सना ‘चोख प्रत्युत्तर’ दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या नवीन संसदेच्या बांधकाम स्थळाला भेट दिली आणि तेथे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.

पंतप्रधानांनी तेथे सुमारे एक तास घालवला आणि बांधकाम स्थितीची पाहणी केली. हे त्याच्या विरोधकांना आवडले नाही. रणवीरने नवीन संसदेच्या बांधकाम साइटवर पंतप्रधान मोदींच्या कामकाजाचा आढावा घेत, सोशल मीडियावर एक ट्विट पोस्ट केले, ज्यात त्यांच्या पायाखाली विरोधी नेत्यांचा समूह दिसून आला.

शौरींचे स्पष्टीकरण आणि नवीन ट्विट-

यावर धमकी मिळाल्यानंतर शौरींनी ट्विटबद्दल स्पष्टीकरण जारी केले आणि आधीच्या कॅप्शनमध्ये वापरलेल्या भाषेबद्दल माफी मागितली. तथापि, शौरी यांनी आपल्या नवीन ट्विटमध्ये म्हटले आहे की, “विरोधकांना काय दोष द्यायचा , ज्यांच्याकडे या देशाला देण्यासारखे काहीही नाही, परंतु 2014 पासून त्यांचा एकच अजेंडा आहे: मोदी-द्वेष….

Only Agenda-Modi Hate : Congress’s bullying-Bhai Jagtap’s Gunda ! Actor Ranveer Shourie threatened for answering abusive meme on Narendra Modi; Shourie said it was just Modi-hatred

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात