कन्हैय्या कुमार एक नंबरचा स्वार्थी; माकपचे सरचिटणीस डी. राजा यांचे जोरदार टीकास्त्र


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या कन्हैय्या कुमारवर पक्षाचे सरचिटणीस डी. राजा नाराज झाले आहेत. त्याच्या या निर्णयावर ते म्हणाले, कन्हैय्या कुमारचा कम्युनिस्ट विचारधारेवरचा विश्वास उडाल्याने आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पक्ष सोडला आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. Kanhaiyya Kumar is the number one selfish; The general secretary of the CPI (M), D. Raja



डी. राजा म्हणाले, कन्हैय्या कुमारने स्वतःहून माकपचा त्याग केला आहे. आतापर्यँत त्याचा कम्युनिस्ट विचाधारेवर प्रचंड विश्वास होता. पण, त्याने पक्ष त्याग केल्याने या विचारांवर त्यांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. माकपने जात आणि वर्ग यांच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याचे ध्येय समोर ठेऊन वाटचाल केली आहे. कन्हैय्या कुमारने स्वतः च्या इच्छा, अपेक्षांच्या पूर्तीसाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काँग्रेसला जवळ केले आहे. याचाच अर्थ त्याचा कम्युनिस्ट विचारसणीवरचा विश्वास उडाला आहे. म्हणूनच त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Kanhaiyya Kumar is the number one selfish; The general secretary of the CPI (M), D. Raja

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात