महाविकास आघाडीचे भांडवलीकरण : आमदारांचे आधी भरले खिसे; पाठोपाठ मुंबईत देणार घरे!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, आमदारांवर खासदारांवर ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांची वक्रदृष्टी असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र आपल्या आमदारांचे जोरदार राजकीय भांडवलीकरण चालविले आहे. MLAs’ previously filled pockets; Homes to be provided in Mumbai next

– आमदार निधीत 1 कोटीची वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 च्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आमदार निधी 1 कोटी रुपयांची भर घालून तो 5 कोटी रुपये केला. म्हणजे आमदारांच्या खिशात एक कोटी रुपयांची भर घातली.+



ही घोषणा होऊन 8 दिवस होतायत ना होतात तोच महाविकास आघाडी सरकारने आमदारांची आणखीन खुशी केली. मुंबईत आमदारांना म्हाडा घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 300 आमदारांना मुंबईत घरे बांधून देणार असल्याचे विधानसभेत सांगितले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले. आधीची सरकारे नुसत्या घोषणा करायचे पण आमचे सरकार अंमलबजावणी पण करते, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला लगावला.

महापालिका निवडणुकांआधी भांडवलीकरण

येता सहा-आठ महिन्यात मुंबईसह राज्यातल्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. एक प्रकारे ही सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीच्या आधी आमदारांचे आधी आर्थिक भांडवलीकरण आणि नंतर घर भरणे महाविकास आघाडी सरकारने करून आमदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

MLAs’ previously filled pockets; Homes to be provided in Mumbai next

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात