Pawar – MIM Alliance : महाविकास आघाडीत “एमआयएम” नावाला; प्रत्यक्षात राष्ट्रवादीला “लाभार्थी” करण्यासाठी धडपड!!


नाशिक : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आघाडी करण्याची ऑफर दिल्याची बातमी आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याच्या बातम्या मराठी प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. जणू काही एमआयएम हा पक्ष महाविकास आघाडीत आल्यानंतर खूप मोठी “राजकीय क्रांती” घडून भाजप राजकीय दृष्ट्या बासनात गुंडाळला जाईल, असे चित्र मराठी माध्यमांनी या बातम्यांमधून तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. Pawar – MIM Alliance ncp and assuddin owaisi

– मराठा – मुस्लिम कॉम्बिनेशन

एमआयएम महाविकास आघाडीत येणार म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादीची धर्मनिरपेक्ष मते आणि मुस्लिम मध्ये एकत्र येऊन भाजपवर मात करता येईल, असा होरा मराठी माध्यमांनी मांडला आहे. पण हे मतांचे त्रैराशिक इतके सोपे आहे का…?? भले शरद पवार यांची मुस्लिम – मराठा कॉम्बिनेशन करण्याचा मनसूबा असेल पण जेव्हा शरद पवार मुस्लिमांना बरोबर उघडपणे जातील तेव्हा त्यांच्या “मनातला” मराठा मतदार राष्ट्रवादीबरोबर राहील का…??, हा कळीचा सवाल इथे विचारला पाहिजे. कारण ज्या मराठा व्होट बँकेच्या आधारे पवार आपले राजकारण पुढे रेटत राहतात त्या मराठा व्होट बँकेलाच तडा जाणार नाही ना…??, हा खऱ्या अर्थाने इथे प्रश्न आहे. कारण मुस्लिमांची उघडपणे जवळीक ही मराठा समाजाला कितपत रुचेल…?? आणि मराठा समाज त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही का…?? हे सवाल गंभीर आहेत.

– वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न फेल

यापूर्वी एमआयएम या पक्षाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करून निवडणुका लढवल्या आहेत. पण या दोन्ही पक्षांची आघाडी राजकीय दृष्ट्या “फेल” ठरली आहे. अशा स्थितीत पवारांनी एमआयएम पक्षाबरोबर आघाडी करणे याचा फायदा खुद्द पवारांना किती होईल…?? आणि महाविकास आघाडीतले बाकीचे दोन घटक पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांना किती होईल…?? याचा नेमका विचार करण्याची गरज आहे.

शिवसेनेला धक्का देण्याचा मनसूबा

मराठवाड्यातली शिवसेनेची संघटनात्मक राजकीय बांधणी लक्षात घेता एमआयएम पक्षाबरोबर जाणे शिवसेनेला कितपत रुचेल…??, हेही पाहणे महत्त्वाचे आहे किंबहुना मराठवाड्यातला शिवसेनेचा पाया उघडण्यासाठी तर पवार एमआयएमला जवळ करत नाहीत ना…??, अशी रास्त राजकीय शंका मनात येते. महाविकास आघाडीत शिवसेना पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर आहेत त्यांच्यातल्या राजकीय रेटारेटी पहिल्या क्रमांकासाठी अर्थातच शरद पवारांची धडपड आहे.

आघाडीत पहिला नंबर पटकावण्याची धडपड

त्यामुळे भाजपला टक्कर देण्याची भाषा करत एमआयएमशी आघाडी करून महाविकास आघाडीत पहिला नंबर पटकावण्याचा पवारांचा हा डाव आहे. पण अंतिमतः मराठा – मुस्लिम कॉम्बिनेशन जमवण्याच्या नादात मूळ मराठा मतदारच बाजूला जाणार नाही ना…?? ही रास्त शंका यानिमित्ताने उपस्थित होते. या शंकेला पवारांकडे उत्तर काय आहे…??

Pawar – MIM Alliance ncp and assuddin owaisi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात