महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे; तुम्ही मूग गिळून गप्प बसला आहात, कुठे गेली तुमची अस्मिता? भाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल


पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे; तुम्ही मूग गिळून गप्प बसला आहात, कुठे गेली तुमची अस्मिता? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.Maharashtra is bowing its head in humiliation and shame; You have remained silent, where has your ego gone? BJP attacks CM


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे; तुम्ही मूग गिळून गप्प बसला आहात, कुठे गेली तुमची अस्मिता? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहणार? असा सवाल देखील भाजपाने विचारला आहे. केशव उपाध्ये म्हणाले, राज्यकर्ते म्हणून पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या महाराष्ट्रात, दररोज महाराष्ट्राचा अपमान होत आहे.दिवसागणिक पोलिसांवर हल्ले होत आहेत, भर दिवसा पोलिसांचे मुडदे पाडले जात आहेत, महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे, आणि तुम्ही मात्र मूग गिळून गप्प बसला आहात.

कुठे गेली तुमची अस्मिता? संगमनेरमध्ये गर्दी करू नका सांगणाऱ्या पोलिसावर जमावाने काल हल्ला केला. पण अजूनही पोलिसांचा अपमान झाल्याचा साक्षात्कार संजय राऊत यांना कसा झाला नाही? हल्लेखोर कोण पाहून टोपी फिरवली की काय?

पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत या बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर केलेल्या घोषणा एवढ्यातच कसे विसरलात? धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहात बसणार.

महसूलमंत्र्यांच्या संगमनेर शहरात या राज्यात नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे हा त्यांचा गुन्हा आहे का? संगमनेरमध्ये पोलिसांनी अजूनही कठोर कारवाई केली नाही. नवाब मलिक तुमचे गृहखाते टोपी पाहून कारवाईचा निर्णय घेते का?

उपाध्ये म्हणाले संगमनेरातील गुन्हेगारांवर कारवाईच्या नावाखाली पांघरूण घालण्याचे षडयंत्र रचले जाणार असेल तर त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल. संगमनेरमध्ये कोरोना नियमांचे धडधडीत उल्लंघन झाले तरी कारवाई कोठे?

नाना पटोले तुम्ही बाळासाहेब थोरातांचे गाव म्हणून गप्प बसलात काय? दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलीस हवालदाराचा निर्घृण खून केला. पोलीस दल हादरले, पण गृहखाते ढिम्म आहे.

दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातच फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका तडीपार गुंडाने पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढविला. पोलिसांचे मनोबल खच्ची करणाऱ्या अशा गुंडगिरीला जबाबदार कोण? तीन दिवसांपूर्वी नागपूरजवळ टोली येथे अवैध दारूधंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने जीवघेणा हल्ला केला. तुफान दगडफेक करून दहशत माजविली,

Maharashtra is bowing its head in humiliation and shame; You have remained silent, where has your ego gone? BJP attacks CM

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात