प्रतिनिधी
मुंबई : “युवराज उलटे घोड्यावर, आदित्य ठाकरे टार्गेटवर!!”, असे चित्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सुरुवातीलाच दिसले. यानिमित्ताने माणसांच्या विधिमंडळात मांजर – बोक्यानंतर घोडा हा तिसरा प्राणी “शिरलेला” दिसला!! Crown Prince on reverse horse; Aditya Thackeray on target
शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकनाथ शिंदे गटाला 50 खोके, एकदम ओके; “50 खोके, खाऊन माजलेत बोके” अशा घोषणा देऊन डिवचले होते. त्याला उत्तर देण्यासाठी काल “लवासाचे खोके, बारामती ओके”, अशा घोषणा शिंदे गटाच्या आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी दिल्या होत्या. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच आमदार महेश शिंदे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या धराधरी आणि हाणामारी देखील झाली होती.
मुंबई: एकनाथ शिंदे के खेमे के कुछ विधायकों ने राज्य विधानसभा के बाहर महा विकास अघाड़ी के विधायकों के ख़िलाफ़ विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/4QyjJwaZ7P — ANI_HindiNews (@AHindinews) August 25, 2022
मुंबई: एकनाथ शिंदे के खेमे के कुछ विधायकों ने राज्य विधानसभा के बाहर महा विकास अघाड़ी के विधायकों के ख़िलाफ़ विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/4QyjJwaZ7P
— ANI_HindiNews (@AHindinews) August 25, 2022
या घोषणाबाजीची आज शिंदे गटाचे आमदारांनी पुढची आवृत्ती काढली आज मात्र शिंदे गटाचे आमदारांच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे हे घोड्यावर उलट्या दिशेने बसल्याचे व्यंगचित्र पोस्टरवर लावून एक भली मोठी विडंबन कविता त्यावर छापली आहे. महाराष्ट्राचे “परम पूज्य युवराज” असे बिरुद लावून शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना लावून त्यांची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे यांनी घरात बसून पर्यटन खाते सांभाळले. इतकेच नाहीतर त्यांच्याच काळात पर्यावरण खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला, अशा आशयाचे हे विडंबन काव्य आहे.
त्याचबरोबर आजच्या घोषणांमध्ये कालच्याच “लवासाचे खोके, बारामती ओके”, “महसूलचे खोके, सोनियाजी ओके” अशा घोषणा पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदारांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more