भाजपा नेत्या सना खान यांनी पती अमितला दिले होते ५० लाख रुपये; पैसे परत मागितल्यावर पतीने दिली भयानक शिक्षा!


२ ऑगस्ट रोजी तिल्हारीच्या राजुल टाऊनशिपमधील झाली होती हत्या

विशेष प्रतिनिधी

नागपूर  : भाजपा नेत्या सना खान यांच्या हत्येबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. नागपूरच्या सना खान यांची हत्या त्यांचा पती अमित उर्फ ​​पप्पू साहू याने केली होती. हत्येनंतर पप्पूने त्यांचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिला. आता त्याच्या जबाबावरून पोलीस मृताच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. BJP leader Sana Khan had given Rs 50 lakh to her husband Amit

५० लाखांसाठी अमितने पत्नी सना यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही रक्कम त्याने पत्नीकडून भागीदारीसाठी घेतली होती. सनाने अमितला हे पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने खुनासारखे भयंकर पाऊल उचलले. पोलीस अद्याप आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

अमितने हत्येबाबत अनेक खुलासे केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने आपला गुन्हाही मान्य केला आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने २ ऑगस्ट रोजी तिल्हारीच्या राजुल टाऊनशिपमधील त्याच्या घरी सनाची हत्या केली. त्याने सनाचा काठीने वार करून खून केला. त्यानंतर अमितने बेलखेडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या पुलावर जाऊन सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिला. त्याच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. पोलिस अजूनही सनाच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

BJP leader Sana Khan had given Rs 50 lakh to her husband Amit

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात