मूळचे “पुणेकर” नसलेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये पुण्याच्या विकासावरून राजकीय जुगलबंदी!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे, पुणेकर आणि पुणेरी पाट्या यांच्या इतकेच पुणेरी टोमणे फेमस आहेत. पुण्यातल्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना कोपरखळ्या मारणे, चिमटे काढणे ही नित्याची बाब आहे. असेच पुण्यातल्या चांदणी चौकातल्या उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या उद्घाटन समारंभात घडले. मूळचे पुणेकर नसलेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये पुण्याच्या विकासावरून राजकीय जुगलबंदी झाल्याचे पुणेकरांना पाहायला मिळाले.Political juggling between two Deputy Chief Ministers who are not Punekars over the development of Pune

पुणे मेट्रो पहिली मंजूर झाली. त्यानंतर नागपूरला मंजूर झाली. पण, तरीही नागपूर मेट्रोचे काम आधी पूर्ण झाले. यावरून देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना टोला हाणला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे हे बुद्धीवंतांचे शहर आहे. त्यामुळे एखादा प्रकल्प नियोजित केला की कुणी अमेरिकेहून रिपोर्ट आणतं, तर कुणी स्वित्झर्लंड, कुणई जर्मनीहून रिपोर्ट आणून प्रकल्पावर आक्षेप घेतो. पुण्याची भाषा प्रमाण आहे, पण रिपोर्ट कोणता प्रमाण? हे काही लवकर ठरत नाही. यावर निर्णय करता करताच वेळ निघून जातो. त्यामुळे पुण्यातील प्रकल्पांना विलंब होतो.तत्पूर्वी अजित पवारांनी आपल्या भाषणात पुण्याहून आधी नागपूरला मेट्रो झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पुण्यात आधी मेट्रो झाली असती, तर आम्ही त्या खचाखच भरून दाखवल्या असता, असे अजितदादा म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले.

…तर मेट्रो या जन्मात झाली नसती

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोला पहिले मंजूरी मिळाली हे खरे आहे. त्यानंतर नागपूर मेट्रोला मंजूरी मिळाली. पण, पुण्याच्या बुद्धीवंतांनी आक्षेप घेतल्यामुळे पुणे मेट्रोचे काम रखडत गेले. तेवढ्या काळात तर नागपूर मेट्रोचे कामही पूर्ण झाले. आमची गडकरींसोबत नेहमी पुणे मेट्रोबाबत सातत्याने बैठका व्हायच्या. एका बैठकीत तर गडकरींनी स्पष्ट सांगितले की, असेच आक्षेप घेत राहिलात, तर तुमची मेट्रो या जन्मात होणार नाही. त्यानंतर कुठे पुणे मेट्रोच्या कामांना वेग आला.

अजितदादांमुळे पुण्याच्या विकासाला गती

फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोला मंजुरी मिळऊनही पुढील निर्णय लवकर न झाल्याने नागपूर मेट्रो प्रथम झाली. पुण्यात केवळ वाढदिवस साजरे करण्यासाठी मेट्रो नसून आता नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. देशभरात सर्व सार्वजनिक वाहतूक एक कार्डवर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्याच्या बाजूने ये – जा करणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुमजली रस्ते जाळे आगामी काळात निर्माण करण्यात येईल. वाहतूककोंडी नसलेले शहर यादृष्टीने आपल्याला पाहावयास लागेल. पुण्यात योग्य वेळी योग्य सुविधा निर्माण झाल्या तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. त्याच प्रमाणे आयटी हब विस्तार वाढेल. पुरंदर विमानतळ लवकर मार्गी लावण्यासाठी भूसंपादन करून पायाभूत सुविधा निर्माण होतील. मोठे विमानतळ नसल्याने आपला विकास काहीसा रेंगाळला आहे. आता अजित पवार सोबत आल्याने पुण्याचे विकासाला गती मिळेल.

 पुण्यात आता हवाई बसेस

पुण्यात आता नवीन रस्त्यांसाठी जागा राहिलेली नाही. त्यामुळे आता हवाई बसेसचा विचार करा, असा सल्ला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिला. तसेच, पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी काळात राज्य सरकारच्या वाहतुकीच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक करणार, असेही गडकरींनी सांगितले.

गडकरी, फडणवीस आणि अजितदादा हे तिघेही पुण्याच्या विकासाबद्दलच बोलले. पण हे तिघेही “पुणेकर” नव्हेत. अजितदादा जरी अनेक वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते, तरी ते मूळचे बारामतीकर आहेत. पण तिघांचेही पुण्यावर “विशेष प्रेम” आहे, हेच आजच्या कार्यक्रमातून दिसले!!

Political juggling between two Deputy Chief Ministers who are not Punekars over the development of Pune

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात