उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्तीसाठी रवाना, मनसेची खोचक टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. अशी खोचक टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला राज्याबाहेर आपला ठसा उमटवता आला नाही.After the resounding success of Uttar Pradesh and Goa, Sanjay Raut leaves for mediation in Russia and Ukraine, sharp criticism of MNS

यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून, त्यात त्यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. झुकेगा नही साला.



शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांमध्ये दौरे काढून जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे यांनीही गोवा आणि युपीत प्रचार केला. मात्र, त्याचे रुपांतर मतांमध्ये न झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

After the resounding success of Uttar Pradesh and Goa, Sanjay Raut leaves for mediation in Russia and Ukraine, sharp criticism of MNS

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात