ओमायक्रॉनचा कहर, नेदरलॅँडमध्ये लॉकडाऊन जाहीर


विशेष प्रतिनिधी

हेग : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे नेदरलँडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान फक्त सुपरमार्केट, वैद्यकीय, व्यवसाय आणि कार गॅरेज यांसारखी अत्यावश्यक दुकानं खुली राहतील.Omaykron’s havoc, lockdown announced in the Netherlands

इतर सर्व दुकानं, शिक्षणसंस्था, हॉटेल्स, संग्रहालयं, चित्रपटगृह आणि प्राणी संग्रहायलयं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.कोरोना व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या भीतीने डच सरकारने देशात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.



नेदरलँड्स पुन्हा लॉकडाउनमध्ये लावावा लागतोय याचं मला दु:ख आहे, असं नेदरलँडचे पंतप्रधान रुट्टे यांनी म्हटलं आहे.रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 5 वाजल्यापासून नवा लॉकडाऊन लावण्यात आला असून १४ जानेवारी २०२२ पर्यंत लागू असेल.

ओमायक्रॉनमुळे देशाला कोरोनाच्या पाचव्या लाटेचा सामना करावा लागणारआहे, आम्हाला कडक लॉकडाऊन लागू करावा लागेल, असं रुट्टे यांनी म्हटलं आहे.ख्रिसमसनंतर नेदरलँडमध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढेल, असा दावा तिथल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला. आहे. त्यामुळे खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Omaykron’s havoc, lockdown announced in the Netherlands

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात