विशेष प्रतिनिधी
काबूल – पंजशीर प्रांतात तालिबानच्या विरोधात उभे ठाकलेल्या नॅशनल रेझीस्टन्स फोर्सने व्यूहात्मक माघार घेतल्याचा दावा केला आहे. ६० टक्के भाग अजूनही आपल्या नियंत्रणात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लवकरच प्रतिआक्रमण करू असा इशाराही त्याने दिला NRFA will take panjashir in hand once again
एनआरएफचा नेता अली नझारी याने एका परदेशी संकेतस्थळाला माहिती दिली. त्यानुसार पंजशीर खोऱ्याची भौगोलिक रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. तेथे हल्ला करणाऱ्या कोणत्याही एका आक्रमकास पूर्ण भाग ताब्यात घेणे अशक्य असते, कारण अनेक लहान खोऱ्यांचा यात समावेश आहे, ज्यातील ६० ते ६५ टक्के लहान खोऱ्यांवर आणि व्यूहात्मक ठिकाणांवर आमचे अजूनही नियंत्रण आहे, असेही त्याने ठामपणे सांगितले.
हा प्रांत गमावल्याचा दावा त्याने खोडून काढला. तालिबानचे मोठे नुकसान झाल्याचे त्याने नमूद केले. पंजशीरमधील सध्याची परिस्थिती बातम्यांच्या तुलनेत जास्त गुंतागुंतीची आहे. तालिबानने केवळ मुख्य मार्ग ताब्यात घेतला आहे. प्रांताचे केंद्र त्यापासून जवळ आहे. त्यामुळेच तालिबान्यांना तेथे त्यांचा झेंडा फडकावता आला
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App