वृत्तसंस्था
काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर नागरिक देश सोडून जात आहेत. मात्र, काही लोक रस्त्यावर उतरुन तालिबानचा निषेध करत आहेत.राजधानी काबूलसह अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरु आहेत.Our flag, our identity’ declaration against the Taliban, protests in several cities, including Kabul; Taliban flag rags by peoples
तसंच या लोकांना समजावण्यासाठी तालिबान देशातील इमामांचीही मदत घेत आहेत. शुक्रवारच्या नमाजच्या वेळी सर्व लोकांना एकत्रित रहायला सांगा, असे तत्यांना सांगितले आहे. गुरुवारी तालिबानी दहशतवाद्यांनी कुनार प्रांतातील असदाबाद येथे आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. काही लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान,काबूलमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला.
अफगाणिस्तान १९ ऑगस्ट १९१९ रोजीच ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला होते. मात्र यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा होण्यापूर्वीच तेथे तालिबानने कब्जा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त आंदोलक रस्त्यावर उतरले. लोक हमारा झंडा, हमारी पहचान अशी घोषणा देत होते. यावेळी पुरुष आणि महिलांनी हाताला काळी पट्टी बांधली होती. आंदोलकांनी काही ठिकाणी तालिबानचा पांढरा झेंडाही फाडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App