वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अवंतीपोराच्या पंपोर भागात आज भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे होते. त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये नागरिकांची हत्या ही केली होती. एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त केले आहे.Two Hizb-ul-Mujahideen terrorists neutralised by security forces in Jammu and Kashmir
ठार झालेल्या एका दहशतवाद्याचा नाव मुसाएब मुश्ताक आहे. मुसाएब हा खिरयूचा रहिवासी आहे. त्यानं २३ जुलैला सरकारी शाळेतील एका शिपायाची हत्या केली होती.गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यात दोन पोलिसांसह तीन जण जखमी झाले.दहशतवाद्यांनी रात्री सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकलं. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील थानामंडी भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले. भारतीय सैन्याचा एक JOC हुतात्मा झाला. एका पोलीस अधिकाऱ्यांनं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जवानांनी थानामंडी भागात सर्च ऑपरेशन सुरु केलं होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App