वृत्तसंस्था
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जन्मदिवसा निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेचे केंद्रीय कक्षात जाऊन राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अन्य खासदार उपस्थित होते.Defence Minister Rajnath Singh paid tributes to former prime minister Rajiv Gandhi on his birth anniversary at Parliament House today
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अनेक महान नेत्यांबरोबर राजीव गांधी यांचेही तैलचित्र आहे. आजच्या त्यांच्या जन्मदिवशी संसदीय कार्यालयाने आदरांजली कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला राजनाथ सिंह यांनी हजेरी लावून आपल्या राजकीय उदारमतवादाचा परिचय दिला.
याच मध्यवर्ती सभागृहात महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर, जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया या महान नेत्यांची देखील तैलचित्रे आहेत. संसदीय कार्यालय त्यांच्याही जयंतीनिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करते. परंतु या कार्यक्रमांना सोनिया गांधी किंवा काँग्रेसचे खासदार क्वचितच हजर राहिलेले दिसतात.
Tributes to our former PM Shri Rajiv Gandhi Ji on his birth anniversary. — Narendra Modi (@narendramodi) August 20, 2021
Tributes to our former PM Shri Rajiv Gandhi Ji on his birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) August 20, 2021
Delhi | Defence Minister Rajnath Singh paid tributes to former prime minister Rajiv Gandhi on his birth anniversary at Parliament House today pic.twitter.com/MHw1FUGuo9 — ANI (@ANI) August 20, 2021
Delhi | Defence Minister Rajnath Singh paid tributes to former prime minister Rajiv Gandhi on his birth anniversary at Parliament House today pic.twitter.com/MHw1FUGuo9
— ANI (@ANI) August 20, 2021
विशेषत: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजलीच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते कधीच उपस्थित राहत नाहीत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती कार्यक्रमात क्वचितच काँग्रेस नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या जयंती कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे खासदार प्रामुख्याने उपस्थिती लावतात. पण या कार्यक्रमाला भाजपचे खासदारही उपस्थित असतात.
या राजकीय पार्श्वभूमीवर आजच्या राजीव गांधी जन्मदिवसाच्या कार्यक्रमाला राजनाथ सिंह यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात उपस्थिती लावली आणि आपल्या राजकीय उदारमतवादाचा वेगळा परिचय देशासमोर आणला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App