काश्मीरमध्ये घडतोय ३६० अंशातला बदल; दहशतवादी बुर्‍हाण वाणीच्या वडिलांनी केले ध्वजारोहण


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तेथे जे सकारात्मक बदल घडत आहेत त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा बदल आज समोर आला आहे. काश्मीरमध्ये ज्या हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी बुऱ्हाण वाणी सुरक्षा दलात बरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता, त्याच्या वडिलांनी आज ध्वजारोहण केले.360 degree change happening in Kashmir; The flag was hoisted by the father of the terrorist Burhan Vani

भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात घडलेला हा मोठा सकारात्मक बदल मानला जात आहे. हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडर बुऱ्हाण वाणी हा सुरक्षा दलांची झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ त्यावेळी काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानात मोठ्या रॅली निघाल्या होत्या. एखाद्या स्वातंत्र्ययुद्धात शहीद झाल्याचा सन्मान पाकिस्तानात त्याला देण्यात आला होता. त्यावेळी काश्मीर मध्ये ठिकठिकाणी त्याच्या समर्थनासाठी निदर्शने होऊन सुरक्षा दलांवर दगडफेकीही करण्यात आल्या होत्या.

परंतु आज काश्मीर मधून 370 कलम हटले आहे. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. तिथे सुरक्षा व्यवस्थेच्या कडेकोट बंदोबस्तात विविध ठिकाणी मोठी विकास कामे सुरू आहेत. त्यामध्ये काश्मिरी युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळतो आहे. रोजगाराच्या नव्या नव्या संधी त्याला उपलब्ध झालेल्या आहेत.

यातूनच मोठा सकारात्मक बदल घडून एका कट्टर दहशतवादी असणाऱ्या बुर्‍हाण वाणीच्या वडिलांनी आज त्रालमध्ये एका शाळेत ध्वजारोहण केले. ज्या जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकविला एकेकाळी तथाकथित गुन्हा मानले जात होते तिथे दहशतवाद्याच्या वडिलांनी तिरंगा फडकवणे हा 360 अंशामधला बदल नाहीतर दुसरे काय म्हणायचे…!!

360 degree change happening in Kashmir; The flag was hoisted by the father of the terrorist Burhan Vani

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था