विशेष प्रतिनिधी
काठमांडू – ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ – युनिफाईड मार्क्सिसिस्ट लेनिनिस्ट’ (सीपीएन-यूएमएल) या नेपाळमधील सर्वांत मोठ्या कम्युनिस्ट पक्षात असलेल्या अंतर्गत वादामुळे फूट पडली आहे. या पक्षाचे एक नेते माधवकुमार नेपाळ यांनी नव्या राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे. Communist party break in two fraction I Nepal
माधवकुमार नेपाळ आणि माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यात प्रचंड वाद आहेत. ओली यांचे सरकार पाडण्यासाठी नेपाळ यांनी तत्कालीन विरोधकांशी हातमिळवणीही केली होती. ओली यांनी तीन दिवसांपूर्वीच नेपाळ आणि त्यांच्या १३ सहकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
नेपाळच्या अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी राजकीय पक्ष कायद्यात सुधारणा करण्यासाठीची अधिसूचना जारी केली. यामुळे एखाद्या पक्षाच्या संसदीय पक्षाचे वीस टक्क्यांहून अधिक सदस्यांना एकत्र येऊन वेगळा पक्ष स्थापन करायचा असल्यास त्याला मान्यता दिली जाणार आहे.
राजकीय पक्षांचे विभाजन सोयीचे करणाऱ्या या अधिसूचनेला सरकारने पाठबळ दिल्यानंतर माधवकुमार नेपाळ यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करत ‘सीपीएन-यूएमएल (समाजवादी)’ या नावाने पक्षाची नोंदणी करण्याची विनंती केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App