हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात दलितांनी वेळ दवडू नये ; सरस्वती सन्मान विजेते शरणकुमार लिंबाळे


विशेष प्रतिनिधी

नागपूर : सरस्वती पूजन असाे, की सरस्वती सन्मान असाे, हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा आणि प्रतीकांची हेटाळणी करण्यात आता अर्थ नाही. या प्रतीकांची अवहेलना करण्यात संपूर्ण पिढी संपून जाते. हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात वेळ दवडण्यापेक्षा आपले प्रश्न काय आणि ते कसे साेडविता येतील, याकडे दलितांनी लक्ष केंद्रित करा, असे आवाहन डाॅ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले.Dalits should not waste time opposing Hindu symbols: Saraswati Award winner Sharan Kumar Limbale

विदर्भ साहित्य संघाचा सत्कार स्विकारल्यानंतर डॉ. लिंबाळे बोलत होते. विशेष म्हणजे या साहित्य संघात होणाऱ्या सरस्वती पूजनाचे कारण देत ज्येष्ठ साहित्यिक, कवी यशवंत मनाेहर यांनी काही काळापूर्वी विदर्भ साहित्य संघाचा सत्कार नाकारला होता. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीतून आलेल्या डॉ. लिंबाळे यांनी याच संघाचा सत्कार स्विकारला. शिवाय त्याचवेळी सरस्वतीसारख्या हिंदू प्रतिकांचा निषेध करण्याची वेळ निघून गेल्याची जाणीवही त्यांनी करुन दिली.विदर्भ साहित्य संघात डाॅ. लिंबाळे यांची मुलाखत झाली. त्यावेळी दलित शब्दाला विराेध कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, दलित हा शब्द शाेषित, पीडित, पिचलेल्या, अन्यायग्रस्त समाजाचे प्रतीक आहे. दलित हे ब्राह्मण किंवा कुठल्याही समाजाचे असू शकतात. या शब्दावर इतकी वर्षे चळवळ चालली आहे.

या भरवशावरच अन्यायाला वाचा फाेडली गेली, त्या शब्दाला विराेध कशासाठी. दलित आणि सवर्णांमध्ये दरी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दलितांचे प्रश्न दलितांनीच साेडवावे असे नाही तर सवर्णांनीही ते साेडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सामुदायिक शाेषणाविरोधात दलित व सवर्णांनी एकत्रित यावे असे ते म्हणाले.

सध्या दलित, आंबेडकरी साहित्यात साचलेपणा आला असल्याचे निरिक्षण डॉ. लिंबाळे यांनी नोंदवले. ते म्हणाले की, पूर्वी चळवळी जाेरकसपणे चालत. त्या प्रश्नांना घेऊन दलित साहित्य भिडत असे. आता चळवळी बंद झाल्या आणि साहित्यही थांबले. नव्या प्रश्नांवर दलित चळवळी उभ्या राहिल्या की दमदार साहित्य निर्माण हाेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आज पुराेगामी समाज संपला की काय, असे वाटते. कारण, पुराेगामी विचारांची माणसे शाेधावी लागतात, असे ते म्हणाले.

सरसकट सवर्णांचा विराेध करणे याेग्य नसल्याचे सांगून डॉ. लिंबाळे म्हणाले की, कारण, सवर्णांमधील पुराेगामी लाेकांचा विराेध करता येत नाही. दलित साहित्याची सवर्ण आणि दलित लेखकांकडूनही समीक्षा हाेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दलितांचे व सवर्णांचे साैंदर्यशास्त्र वेगवेगळे असते.

सवर्णांचे साैंदर्यशास्त्र आनंदावर अवलंबून असते. मात्र, दलितांचे साैंदर्यशास्त्र अन्यायाची अस्वस्थता मांडणारे असते. ‘बलुतं’, ‘उपरा’ वाचून आनंद नव्हे तर अस्वस्थता निर्माण हाेईल. दलितांचे साैंदर्यशास्त्र अन्याय, अत्याचाराविरुद्ध क्रांती निर्माण करणारे असल्याचे डाॅ. लिंबाळे म्हणाले.

Dalits should not waste time opposing Hindu symbols: Saraswati Award winner Sharan Kumar Limbale

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था