अफगणिस्थानमधील पराभवाचे खापर ज्यो बायडेन यांच्यावर, अमेरिकेतील लोकप्रियता सात टक्यांनी घटली


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अफगणिस्थानवर तालीबानने कब्जा केल्यामुळे अमेरिकेची संपूर्ण जगात नालस्ती झाली आहे. अमेरिकेन जनतेने यासाठी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना जबाबदार धरले आहे. बायडेन यांची लोकप्रियता सात टक्यांनी घटली आहे.Joe Biden loses popularity by 7% to over defeat in Afghanistan

अमेरिकेत सोमवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय जनमत सर्वेक्षणात असे आढळून आले की ४६ टक्के अमेरिकन प्रौढांनी बिडेन यांच्या कार्यालयातील कामगिरीला मान्यता दिली आहे. जानेवारीमध्ये बिडेन यांनी पदभार स्वीकारल्यापासूनचे हे सवार्त कमी प्रमाण आहे. यापूर्वी बायडेन यांची लोकप्रियता ५३ टक्के होती.

अमेरिकेचे सैनिक सुमारे वीस वर्षांपासून अफगणिस्थानमध्ये लढत होते. अमेरिकेने याठिकाणी १ ट्रिलियन डॉलर्स खर्च केले आहेत. हजारो अमेरिकन सैनिकांचे प्राणही गेले आहेत. मात्र, अमेरिकेने सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यावर ३८ दिवसांतच तालीबानने अफगणिस्थानवर कब्जा मिळविला. त्यामुळे अराजकता माजली आहे. त्याचे कारण अमेरिकेने घेतलेली माघार आहे. बायडेन यांनी हा निर्णय घेतल्याने रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्हीही मतदार त्यांच्यावर नाराज झाले आहेत.



अफगणिस्थानचा प्रश्न बायडेन यांनी ज्या पध्दतीने हाताळला ते बहुतांश अमेरिकन नागरिकांना आवडलेले नाही. अमेरिकेच्या इतिहासात सर्वात प्रदीर्घ चाललेल्या युध्दाचे नेतृत्व करणाºयांपेक्षा बायडेन हे वाईट राष्ट्रपती ठरले असल्याचे या सर्व्हेमधून दिसून आले आहे.

तालिबानने विजय मिळविल्यावर हताश झालेल्या नागरिकांनी पळून जाण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. त्याचे फोटो जगभर व्हायरल झाले होते. त्याचा मोठा परिणाम जनमतावर झाला आहे.अफगणिस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा निर्माण व्हावी यासाठी अतिरिक्त सन्ैय पाठविण्याच्या निर्णयाचे ७५ टक्के अमेरिकनांनी समर्थन केले आहे. त्याचबरोबर अमेरिकन सैैन्याला मदत करणाºया अफगाण नागरिकांना तालीबानच्या बदल्यापासून वाचविण्यासाठी बाहेर काढावे असेही नागरिकांचे मत आहे.

युध्द अमेरिकेसाठी वाईट पध्दतीनेच संपेलअसे १६ ते ६५ वयोगटातील ६८ टक्के नागरिकांना वाटत होते. अमेरिकन सन्ैयाने नियोजित वेळीच अफगणिस्थान सोडावे असे ६१ टक्के लोकांना वाटते. अमेरिकेने आणखी एक वर्ष अफगाणिस्थानात सैन्य ठेवणे फायदेशीर ठरले असते असे ५१ टक्के लोकांना वाटते. तालीबान्यांशी लढण्यासाठी अमेरिकेने पुन्हा एकदा सैैन्य पाठवावे असे ५० टक्के लोकांना वाटते.

अफगणिस्थानच्या प्रश्नावर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघांच्या दृष्टीकोनात फारसा फरक नाही. १० पैैकी सहा रिपब्लिकन आणि सात डेमाक्रॅट यांचे मत आहे की अफगाण सरकार ज्या पध्दतीने इतक्या कमी वेळात हरले हे पाहता अमेरिकेने आणखी काही काळ तेथे राहणे चुकीचेच होते. केवळ ४४ टक्के मतदात्यांनी बायडेन यांनी अफगणिस्थानचा प्रश्न चांगल्या पध्दतीने हाताळल्याचे म्हटले आहे.

याउलट माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि बराक ओबामा यांनी या प्रश्नी चांगले काम केल्याचे ५१ टक्के लोकांचे मत आहे.अफगणिस्थानमध्ये सन्ैय कारवाई करण्याच निर्णय घेणारे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनाही बायडेन यांच्यापेक्षा जास्त अमेरिकनांनी पंसती दिली आहे. ४७ टक्के नागरिकांना वाटते की बुश यांनी चांगले काम केले होते.

Joe Biden loses popularity by 7% to over defeat in Afghanistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात