MPSC: पीएसआयच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा : विद्यार्थी राज्य सरकारवर संतापले;आंदोलनाचा इशारा


एमपीएससी आयोगाने आरक्षणानुसार पद भरती न केल्याने धनगर आणि वंजारी समाजातील विद्यार्थ्यांचा संताप.MPSC: Dhangar Samaj gets only three seats in PSI recruitment: Students angry over state government;A warning of agitation


विशेष प्रतिनिधी

पुणे: एमपीएससी आयोगाने आरक्षणानुसार पद भरती न केल्याने धनगर आणि वंजारी समाजातील विद्यार्थी संतापले आहेत. पीएसआयच्या भरतीत अवघ्या तीनच जागा दिल्याने या विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. MPSC: Dhangar Samaj gets only three seats in PSI recruitment: Students angry over state government;A warning of agitation

एमपीएससी आयोग धनगर आणि वंजारी समाजाला आरक्षणानुसार जागा देत नाही. त्यामुळे धनगर समाजातील मुलांवर अन्याय होत असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. 2020च्या एमपीएससी आणि पीएसआय पदांच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने आरक्षणानुसार जागा भराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीडी आणि एनटीसी जागा आरक्षणानुसार द्या, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्य सरकार वर संताप

एमपीएससी आयोगावर नेमण्यात आलेले नवनिर्वाचित तीनही सदस्य हे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आहेत, असा आरोप करत आघाडी सरकारने विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य पॅनेलवर घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनेलवरील काही जागा रिक्त होत्या. त्या जागांवर राज्य सरकारने नियुक्त्या केल्या आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे सदस्य शासनाने पॅनेलवर घेतले आहेत.

MPSC पॅनेलवर विदर्भातील ओबीसी सदस्य घ्या, केवळ पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नकोत, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच ओबीसी सदस्य न घेतल्यास त्यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता.

MPSC: Dhangar Samaj gets only three seats in PSI recruitment: Students angry over state government;A warning of agitation

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात