आलिया, दिपिकाचे चित्रपट, माधुरीच्या वेबसिरीजची फेब्रुवारीत प्रेक्षकांना मेजवानी; पाच चित्रपट झळकणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : फेब्रुवारीत अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होण्यासाठी सज्ज असून त्यापैकी काही थिएटरमध्ये तर काही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.  आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा २५ फेब्रुवारीला थिएटरमध्ये झळकणार असून माधुरी दीक्षित आणि संजय कपूर The Fame Game या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेचा गहराईयां ११ तारखेला रिलीज होणार आहे. जानेवारीमध्ये  ‘पुष्पा: द राइज’ आणि ’83’ चित्रपट झळकले होते. Alia, Deepika’s film, Madhuri’s webseries Feast in February; Five films will be screened

लूप लुटेरा

दिग्दर्शक आकाश भाटियाचा लूप लुटेरा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ४ फेब्रुवारीला रिलीज होत आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत आहेत.

गहराईयां

दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी यांच्या या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी लोकांना पसंत पडत आहेत. हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी Amazon Prime Original वर रिलीज होणार आहे.

बढाई हो

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांची मने जिंकत आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

गंगूबाई काठियावाडी

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा अनेक  दिवसांपासून रिलीजच्या प्रतीक्षेत आहे.प्रेक्षकही त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. आलियाचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट २५ फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

फेम गेम

या वेब सिरीजमध्ये माधुरी दीक्षित आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. बऱ्याच दिवसांनंतर माधुरी आणि संजय पुन्हा काम करणार आहेत. ही वेबसीरिज २५ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Alia, Deepika’s film, Madhuri’s webseries Feast in February; Five films will be screened

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात