दहावी, बारावीच्या ३० लाख मुलांची ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यच; वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात ३० लाखांवर मुले दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यच असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्ट केले. Online examination of 30 lakh students of 10th and 12th standard Impossible to take; Varsha Gaikwad’s explanation

परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात ,यासाठी विद्यार्थ्यांनी नुकतेच विविध शहरात आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ३० लाख मुलांची एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी राज्यात तशी व्यवस्था नाही. तशा व्यवस्थेसाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो.



राज्यात कोरोनामुळे  विद्यार्थ्यांना अभ्यासाला कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून परिक्षा पुढे ढकलण्याची, रद्द करण्याची किंवा ऑनलाइन घेण्यासंदर्भात सोशल मीडियावर मागणी होत आहे. या मुद्यावर विद्यार्थ्यांनी निदर्शने करून परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसल्याचे मत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

Online examination of 30 lakh students of 10th and 12th standard Impossible to take; Varsha Gaikwad’s explanation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात