वृत्तसंस्था
चंडीगड – पंजाब काँग्रेसला काय झाले ते समजत नाही. मुख्यमंत्री बदलून एक आठवडाही पूर्ण होत नाही, तोच ज्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस श्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सारखा मुख्यमंत्री बदलला, त्या नवज्योत सिंग सिध्दू यांनीच आज दुपारी अचानक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला आहे.Political quake in Punjab again, Navjot Singh Sidhu resigns as state president
कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत पोहोचले आहेत. तर तिकडे नवज्योत सिंग सिध्दू यांनी तडकाफडकी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे.
Punjab Congress chief Navjot Singh Sidhu resigns pic.twitter.com/KbDbderXeo — ANI (@ANI) September 28, 2021
Punjab Congress chief Navjot Singh Sidhu resigns pic.twitter.com/KbDbderXeo
— ANI (@ANI) September 28, 2021
पंजाबच्या हिताशी समझोता करणार नाही, मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे. पण काँग्रेसचा एकनिष्ठ सैनिक म्हणून काम करीत राहीन, असे नवज्योत सिंग सिध्दू यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App