ही घटना पुणे शहरातील किरकिटवाडी परिसरात घडली आहे. संजीव दिगंबर कदम ( वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव आहे.Last year, two children died due to illness, while a 40-year-old father committed suicide by hanging in Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलांच्या मृत्युमुळे नैराश्यात असलेल्या पित्याने स्वतःच आयुष्य संपवल. ही घटना पुणे शहरातील किरकिटवाडी परिसरात घडली आहे. संजीव दिगंबर कदम ( वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव आहे.
संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासून संजीव नैराश्यात होते. शेवटी त्यांनी टोकाचं पाऊल उचलले आणि गळफास घेतला. या घटनेमुळे सगळीकडे याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App