छत्तीसगडमधील नेतृत्व बदलाच्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोहन मकराम यांची फोडणी


वृत्तसंस्था

रायपूर : पंजाबमध्ये नेतृत्व बदल करूनही काँग्रेस मधला वाद अजून थांबायला तयार नाही. असंतुष्ट नेते सुनील जाखड हे काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला पोहोचले आहेत, पण त्यांना भेट मिळालेली नाही असे असताना छत्तीसगड मधला काँग्रेसचा वाद देखील पुन्हा एकदा उफाळून पाहत आहे.Congress state president Mohan Makram’s outburst in Chhattisgarh over change of leadership

मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि मंत्री टी. एस. सिंगदेव यांच्या वादात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मकराम यांनी उडी घेतली आहे. मी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा समर्थक नाही आणि मंत्री टी. एस. सिंगदेव यांचाही समर्थक नाही. मी प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख आहे, अशा शब्दांत मोहन मकराम यांनी “दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो”, असे सूचित केले आहे.



मोहन मकराम यांच्या विधानाकडे ते स्वतः नेतृत्व स्पर्धेत उतरल्यासारखे पाहिले जात आहे. भूपेश बघेल आणि टी. एस. सिंगदेव यांच्यातला वाद शमत नाही तोच छत्तीसगडमध्ये मोहन मकराम यांच्या रुपाने मुख्यमंत्रीपदासाठी तिसरा स्पर्धक तयार झाला की काय?, अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. मोहन मकराम यांना राहुल गांधी यांचाही पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

पंजाबमध्ये नेतृत्व बदल करताना कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या जागी राहुल गांधी यांनी चर्चेत नसलेला चेहरा चरणजीत सिंग चन्नी यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपदावर आणून बसविला. बंडखोरी करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू किंवा मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत उतरलेल्या कोणत्याही नेत्याला त्यांनी मुख्यमंत्री होऊ दिले नाही.

हे सूत्र लक्षात घेतले तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल आणि टी एस सिंगदेव यांच्या वादात कदाचित आपला नंबर लागू शकतो, असे मोहन मकराम यांना वाटले असल्यास नवल नाही असे येथील राजकीय निरीक्षक मानतात.

Congress state president Mohan Makram’s outburst in Chhattisgarh over change of leadership

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात