विशेष प्रतिनिधी
दीपू – आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी पाच ट्रकना आग लावली. यात सर्व ट्रकचालकांचा मृत्यू झाला. Terrorist killed five truck drivers
रंगीरबील भागात उभ्या असलेल्या पाच ट्रकवर ‘दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी’च्या संशयित दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यात दोन ट्रकचालकांचा मृत्यू झाला. अन्य तीन चालकांचा आगीत जळून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या ट्रकमधून दिमा हसाओ जिल्ह्यातील उमरंगसू येथून होजाय जिल्ह्यातील लंका येथे कोळसा वाहून नेला जात होता.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आसाम रायफल्सच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. घटनास्थळी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संबंधित दहशतवाद्यांनी पैशाची मागणी केली होती, असा दावा ट्रकमालकांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App