विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज कुंद्रा याच्या अश्लिल व्हिडीओ उद्योगासंदर्भात पोलीसांनी शिल्पा शेट्टीची घरी जाऊन चौकशी केली होती. यावेळी शिल्पा शेट्टी ढसाढसा रडली होती. यावेळी राज कुंद्रा आणि तिच्या जोराचा वादही झाला होता अशी माहिती समोर आली आहे.During the interrogation, Shilpa Shetty and her husband Raj Kundra had a heated argument in front of the police, Shilpa broke out
राज कुंद्रा याला अटक केल्यावर पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन तिचीही चौकशी केली होती. यावेळी राज कुंद्राही सोबत होता. यावेळी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात वादही झाला. आपले निवेदन नोंदविताना शिल्पा शेट्टी पोलिसांसमोरच ढसाढसा रडू लागली होती.तसेच शिल्पाने आपला पती राज कुंद्रा निर्दोष असेल्याचेही म्हटले आहे.
वादग्रस्त अॅप हॉटशॉटवर काय कंटेंट दिखविला जात होता, यासंदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस माहिती नव्हती, असे शिल्पाने रडत रडतच सांगितले. इरॉटिका हा प्रकार पॉर्नपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. आपला पती राज कुंद्राचा पॉर्न फिल्म्सशी काहीही संबंध नाही, असेही तिने सांगितले.
राज कुंद्रासह एकूण 11 जणांना 19 जुलैला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म्सच्या व्यवसायाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या व्यवसायात राज कुंद्राने मोठा पैसा गुंतविला होता आणि यातून तो मोठा नफाही कमवत होता.
राजचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. त्याचे चार कर्मचारी सरकारी साक्षीदार होणार आहेत. त्यांनी मुंबई क्राइम ब्रँचला अश्लील फिल्म रॅकेटसंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे.
टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठसह इतर तीन लोकांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आपण सध्या मुंबई बाहेर असल्याचे गहना वशिष्ठने सांगितले आहे. यामुळे ती हजर होऊ शकणार नाही.या प्रकरणाच्या तपासात आपण पूर्णपणे मदत करण्यास तयार आहोत, असेही तिने म्हटले आहे.
शिल्पाने पोलीसांना सांगितले की, माझा पती राज कुंद्रा याचा अश्लील चित्रपट बनविण्याशी काहीही संबंध नाही. माझा मेव्हणा प्रदीप बक्षी हा हॉट शॉट अॅपचा सर्व कारभार पाहतो. हॉटशॉटचे २० लाख ग्राहक आहेत.
मढ समुद्रकिनाºयावरील एका बंगल्यात फेब्रुवारी २०२१मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून अश्लील चित्रपट आणि वेबसिरिज बनविणा?्यांना अटक केली होती. याच प्रकरणात राज कुंद्रा यांनाही अटक करण्यात आली.शिल्पा शेट्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, माझा पती राज कुंद्रा हा निरपराध आहे. हॉटशॉट अॅपवर झळकलेले चित्रपट कामुक आहेत पण अश्लिल नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App