वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूळ काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना राष्ट्रीय पंख फुटले आहेत. TMC is going to enter national politics through virtual programmes on July 21. Giant screens will come up in Tripura, Assam, Odisha, Bihar, Punjab, UP & Delhi on July 21.
Uttar Pradesh is a deciding factor in 2024 General elections and BJP is going to lose in 2022 UP Assembly polls: TMC leader Madan Mitra pic.twitter.com/GKyfX5zSoO — ANI (@ANI) July 19, 2021
Uttar Pradesh is a deciding factor in 2024 General elections and BJP is going to lose in 2022 UP Assembly polls: TMC leader Madan Mitra pic.twitter.com/GKyfX5zSoO
— ANI (@ANI) July 19, 2021
तृणमूळ काँग्रेसचे खासदार मदन मित्रा यांनी ते जाहीर केले आहेत. दिल्लीत २०२४ मध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार असेल, असे भाकीतच मदन मित्रा यांनी केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या दिशेने पावले टाकायला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसने सुरूवातही केली आहे.
ममता बॅनर्जींचा पहिला राष्ट्रीय कार्यक्रम व्हर्च्युअली सर्व देशभर येत्या २१ जुलैला होणार आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, त्रिपूरा, आसाम आणि उडिशा या राज्यांमध्ये ठिकठिकाणी मोठे स्क्रीन लावून ममता बॅनर्जींचे भाषण ऐकविले जाणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसची राष्ट्रीय राजकारणात ही धमाकेदार एंट्री असणार आहे, असे मदन मित्रा यांनी जाहीर केले आहे.
२०२२ च्या उत्तर प्रदेशातल्या निवडणूका या निर्णायक सिध्द होतील. या निवडणूकीत भाजपचा पराभव होईल. त्यानंतर त्या पक्षाच्या राजकीय प्रभावाला कायमची ओहोटी लागेल. तोच २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी निर्णायक घटक ठरेल, असा दावाही मदन मित्रा यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App