‘शेतकऱ्यांवर संतापले प्रकाश आंबेडकर; पुढाऱ्यांबाबतच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘शेतकरीच नालायक आहेत,’ अशी टीका करत त्यांनी ‘मरायचंच असेल तर १०-१२ पुढाऱ्यांना मारून मरा,’ असे धक्कादायक विधान केले. रविवारी (२५ ऑक्टोबर) बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली. Prakash Ambedkar

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या नेत्यांना शेतकरी मतदान करत नसल्याबद्दल आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली. बुलढाण्यात रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत असतानाही शेतकरी त्यांना निवडून देत नाहीत. शेतकऱ्यांसाठी जो नेता प्रामाणिकपणे लढतो, त्याला ते मत देत नाहीत. शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या तोंडात मारून घेतले पाहिजे,’ अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या मतदानाच्या भूमिकेवर टीका केली. Prakash Ambedkar

शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले , आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पुढाऱ्यांनी भेटायला जाऊ नये . राजकीय नेत्यांविरोधात हिंसाचार करण्याचे आवाहन करणारे वक्तव्य केले. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.



राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अल निनोच्या संभाव्य परिणामांची माहिती आधीपासून असतानाही राज्य सरकारने अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याबाबत आवश्यक नियोजन केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दुष्काळग्रस्त नागरिकांना अन्नधान्य, पाणी आणि चारा उपलब्ध करून दिला जात नसेल, तर त्यांनी मंत्री, आमदार, खासदार आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या घरांसमोर जाऊन जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात एकीकडे पावसाअभावी दुष्काळाचे संकट निर्माण होत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

या निवडणुकीत पाचही उमेदवारांनी प्रत्येक मतासाठी पाच हजार रुपये खर्च केल्याचा दावा करत सुमारे १५ कोटी रुपये कुठून आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Prakash Ambedkar sparks controversy with call for violence against politicians

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात