आरोप-प्रत्यारोप थांबवा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावा; शिंदे यांचे शिवसैनिकांना आदेश

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई :- जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची अहमहमिका सुरू झाली होती. ते थांबवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.



राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून, अशा काळात शेतकऱ्याला आधार देणे हे शिवसेनेचे पहिले कर्तव्य आहे, असे शिंदे यांनी सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागांसाठी साडेतीन लाख धान्य किट पाठवल्या होत्या. त्या संबंधित भागांत पोहोचल्या असून, गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत त्या थेट पोहोचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेली मदत प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचते की नाही, याची कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, असेही ते म्हणाले. सरकारी मदतीचे अर्ज भरण्यापासून पंचनाम्यांपर्यंतच्या सर्व प्रशासकीय कामांत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दसरा मेळाव्यातील भाषणात शिंदे यांनी यंदा बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असा शब्द दिला होता. तो पाळण्यासाठी सर्व मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Eknath Shinde urges Shiv Sena workers to stop blame game, help drought-hit farmers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात