लष्करे तैय्यबाचा म्होरक्या नदीम अब्रार चकमकीत ठार

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू- काश्मीररमधील पारिमपुरा भागात झालेल्या चकमकीमध्ये ‘लष्करे तैय्यबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या नदीम अब्रार आणि एका पाकिस्तानी नागरिकाला ठार करण्यात आले.
येथील महामार्गावर हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती गुप्तचरांना मिळताच सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.Let terrorist killed in gunfire

पारिमपुरा नाका परिसरामध्ये जवानांनी तपासणीसाठी एका वाहनाला रोखले असता मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने बॅग उघडून ग्रेनेड काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि जवानांनी मोठ्या शिताफीने या व्यक्तीला अटक केली.



अटक केलेल्या व्यक्तीच्या तोंडावरील मास्क काढला असता ती व्यक्ती लष्करे तैय्यबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर नदीम अब्रार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल देखील जप्त केले आहे.

अब्रारने चौकशीदरम्यान येथील एका घरामध्ये ‘एके-४७’ रायफल ठेवली असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला येथील परिसरामध्ये आणण्यात आले. या वेळी घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार केला. याला जवानांनी देखील प्रत्युत्तर दिले. या गोळीबारामध्ये अब्रारसह त्याचा साथीदार देखील मारल्या गेला.

Let terrorist killed in gunfire

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात