विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवून त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही सुनावला. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया राणा यांनी दिली आहे. Loksabha membership of Navneet Rana gets in trouble
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणा यांनी अमरावतीतून अनुसूचित जाती विभागातून निवडणूक लढवली होती. यात त्यांनी मोची जातीचा दाखला दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी या न्यायालयात याचिका केली आहे. राणा या पंजाबमधील लुभाणा समाजाच्या आहेत; मात्र त्यांनी बनावट कागदपत्रे दाखल करून मोची जातीचे प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता. यावर खंडपीठाने निकालपत्र जाहीर केले.
‘राणा यांनी जाणीवपूर्वक जातपडताळणी समितीकडे खोटी कागदपत्रे सादर केली आणि चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळवले आणि या प्रमाणपत्रामुळे मिळणारे लाभही घेत आहेत. त्यामुळे त्यांना दोन लाख रुपयांचा दंड सुनावत असल्याचे त्यात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App