श्रायबर कामगारांच्या आंदोलनावर पोलिसांची कारवाई; सहा आंदोलकांना घेतले ताब्यात!

Schreiber workers

विशेष प्रतिनिधी

बारामती :वेतनवाढीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या श्रायबर डायनामिक्स कंपनीच्या कामगारांच्या आंदोलनाला पोलिसांनी रोखल्याने बारामती एमआयडीसीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जाहीर सभा आणि मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन असतानाच बारामती तालुका पोलिसांनी परवानगी नाकारली. याप्रकरणी सहा कामगारांना ताब्यात घेतल्याने कामगार आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला.Schreiber workers

श्रायबर कंपनीतील कामगारांचा वेतनवाढीचा करार प्रलंबित असून, व्यवस्थापनाने चर्चेतून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी कामगारांची मागणी आहे. या मागणीसाठी कामगारांनी आज कंपनीच्या गेटसमोर जाहीर सभा घेण्याबरोबरच भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या आंदोलनाला बारामती एमआयडीसीतील तब्बल ११ कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप येण्याची शक्यता होती.



मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली. तसेच आंदोलनाच्या आयोजनासंदर्भात काही कामगारांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी सहा कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी पोलीस ठाण्यात गर्दी करत ठिय्या आंदोलन सुरू केले. कंपनी व्यवस्थापनाकडून वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावला जात नसताना आता पोलिसांच्या कारवाईमुळे कामगारांमधील नाराजी आणखी वाढली आहे. कंपनीकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपले जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. दरम्यान, ११ कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने या आंदोलनाकडे एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Police put a stop to the Schreiber workers’ protest; six workers taken into custody

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात