दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार – राज्यमंत्री योगेश कदम

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे

विशेष प्रतिनिधी

पालघर : दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही गृह (शहरे ) महसूल, ग्रामविकास व पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी शेतकऱ्यांना दिली.

राज्यमंत्री योगेश कदम यांनी मोखाडा तालुक्यातील हट्टीपाडा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, पोलीस निरीक्षक अजित साबळे, नायब तहसीलदार डॉ.बाळाराम भला तसेच अधिकारी आणि ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

मोखाडा तालुक्यातील हट्टीपाडा येथे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या भेटीचे नियोजन करण्यासाठी अवघे २४ तासही मिळाले नव्हते. मात्र, सहकारी आणि पाड्यातील ग्रामस्थांनी अत्यंत मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेले असतानाही आदिवासी समाजाने आपली समृद्ध संस्कृती जपत पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. शेतकऱ्यांच्या या आपुलकीबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

“आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत साजरी होत असलेली दिवाळी माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची आणि मोठी दिवाळी असल्याची भावना राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली.

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला घरी न थांबता शेतकऱ्यांसोबत सण साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे कदम यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जालना आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी करत असल्याचा उल्लेख करत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतकऱ्यांसोबत सण साजरा करण्यासाठी हट्टीपाड्यात आल्याचे राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. यावेळी ग्रामस्थांसाठी दिवाळी फराळाची भेट देण्यात आली.

दिवाळीचा आनंद साजरा करत असतानाही शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे असल्याची जाणीव शासनाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई मिळवून देणे महत्त्वाचे असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

हट्टीपाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत प्रशासनाकडून माहिती घेतल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. शासनाच्या प्राथमिक स्वरूपातील पाच हजार रुपयांच्या मदतीअंतर्गत पाड्यातील बाधित शेतकऱ्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही पुढील चार दिवसांत मदत मिळणार आहे, ई-केवायसी किंवा आवश्यक पुराव्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट पाड्यावर येऊन विशेष शिबिर आयोजित करावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकारी वर्गांना दिली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत,
“शेतकऱ्याने कार्यालयात येण्याऐवजी अधिकाऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या दारात पोहोचले पाहिजे,” असे सांगत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. प्राथमिक मदतीबरोबरच मुख्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठीही शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले

Farmers in drought-affected areas will soon receive aid – Minister of State Yogesh Kadam

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*

    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात