विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवई येथील आयआयटी कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक ६ मध्ये सिलिंडरच्या पाइपमधून गॅस गळती होऊन भडका उडाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.२४ वाजता सिलिंडरच्या पाइपमधून गॅस गळती झाल्यानंतर भडका उडाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाकडून संबंधित यंत्रणेला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेत अंश अहिरवार (१२), तहजीब आलम (९), ईश्वर सिंह (३७), शिवकुमार सिंह (३४) आणि अनिलकुमार यादव (२३) हे पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी अंश अहिरवार, तहजीब आलम, शिवकुमार सिंह आणि अनिलकुमार यादव या चार जखमींना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले, तर ईश्वर सिंह यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने त्यांच्या प्रकृतीवरही वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सिलिंडरच्या पाइपमधून झालेल्या गॅस गळतीमुळे भडका उडाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही केली असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App