विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे आका मोदी शाह यांच्याविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपले उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मधील कार्यक्रम रद्द केले आहे. Harshvardhan Sapkal
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार त्यांना भेटायला गेले ते त्यांना भेटत नाहीत. या व्होटचोर ज्ञानेशकुमारला काँग्रेस कार्यकर्ते महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाहीत आला तर त्याच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, व्होटचोर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार संविधानिक पदावर बसून भाजपच्या एजंटप्रमाणे वागत आहेत. त्यांनी देशातील लोकशाहीची हत्या केली असून या देशद्रोहीविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. संपूर्ण देश रस्त्यावर उतरून ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यामुळे त्यांच्या नियोजित दौऱ्यांमध्ये सातत्याने बदल होत असून मेरठ, वाराणसीनंतर आता ७ व ८ ऑक्टोबर रोजीचा छत्तीसगड दौराही स्थगित करण्यात आला आहे. फॉर्म ६ मध्ये बेकायदा बदल करून १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे.
या पापाची शिक्षा ज्ञानेशकुमार आणि संरक्षण देणा-या आकांना भोगावीच लागणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मतदारांच्या हक्कांसाठी आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी संघर्ष करत राहील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App