फडणवीसांनी हातात घेतली शाडूची माती अन् घडवला बाप्पा; हजारो मुलांनी रचला विश्वविक्रम!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हस्ते शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती साकारली. यावेळी लहान मुलांसोबत गणेशमूर्ती घडवत त्यांनी हरित, स्वच्छ आणि शाश्वत महाराष्ट्राचा संकल्प अधिक बळकट केला. Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ‘ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा॥’ या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीने श्री गणरायाला अभिवादन केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेत मोठ्या संख्येने मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारत मुलांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

‘महा गणेशमूर्ती या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये महाराष्ट्राच्या नावावर सुवर्ण अक्षरांनी नवा विक्रम नोंदवला.



या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हजारो मुलांनी एकाचवेळी गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक स्तरावर पोहोचला आहे.

मातीच्या गणेशमूर्तींचा वापर, जलप्रदूषणाला आळा आणि पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळे’च्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लहान मुलांसोबत श्री गणेशाचे हे मंगलमय रूप साकारताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याची संधी मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. हरित, स्वच्छ आणि शाश्वत महाराष्ट्र घडवण्याच्या संकल्पाला अशा उपक्रमांमुळे अधिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Fadnavis took Shadu clay in his hands and sculpted Bappa.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात