शिंदेंनी नेमकी कोणाची बाजू घेतली? जरांगेंचा थेट सवाल; ‘त्या’ प्रमाणपत्रावरून पुन्हा खळबळ

विशेष प्रतिनिधी

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. “शिंदेंनी चूक केली ती कबूल करा. एकनाथ शिंदेंना बोललो त्याचं वाईट वाटलं, पण त्यांनी शिरसाठेंचं ऐकून आमचं प्रमाणपत्र रद्द का केलं?” असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. Manoj Jarange

जरांगे यांच्या उपोषणाचा मंगळवारी ११वा दिवस होता. फडणवीस आणि शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांवर काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर जरांगेंनी त्याला प्रत्युत्तर दिले. “चुकीला चुकीचं म्हणू नको का? आम्ही तुम्हाला दलाल म्हणून बोलायला ठेवले आहे का? तुमच्या मनगटात फक्त पैशाची ताकद आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

‘फडणवीस, शिंदेंच्या सांगण्यावरून आमच्यावर हल्ला?’

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जरांगेंनी टीका केली. “राधाकृष्ण विखेंचं सोडून काहीही विचारा. त्यांनी मराठ्यांना अर्धवट फासावर सोडून दिलं. आंदोलन कसं मोडायचं, हेच ते पाहत आहेत. फडणवीस आणि शिंदेंच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर हल्ला करता का?” असा सवाल त्यांनी केला.



‘१५ पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही’

सरकारकडून १५ पैकी १२ मागण्या मान्य झाल्याच्या दाव्यावरही जरांगेंनी आक्षेप घेतला. “१५ पैकी १२ मागण्या मान्य झाल्या, याला न्याय देणं म्हणत नाहीत. तुम्ही गरीबांचं वाटोळं केलं. मराठा समाजाला पश्चात्ताप करण्याच्या उंबरठ्यावर आणलं. मराठा समाज बाप आहे, हे तुम्हाला माहीत नाही,” असे ते म्हणाले.

शिष्टमंडळाशी चर्चा करताना एक आणि नंतर वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “शिष्टमंडळासमोर वेगळं बोलता, गाडीत बसल्यानंतर वेगळं आणि हॉटेलमध्ये असताना वेगळं बोलता. तुम्ही काहीही मान्य केलेलं नाही. १५ पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही,” असा दावा जरांगेंनी केला.

‘प्रश्न सोडवायचे नसतील तर अंतरवालीत येऊ नका’

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची सरकारची तयारी नसेल तर शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीत येऊ नये, असेही जरांगे म्हणाले. “आरक्षण देताना यांच्यावर बोलू नका, त्यांच्यावर बोलू नका, असे सांगणे योग्य नाही. तुम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे नसतील तर येऊ नका. तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करून संपून जाणार, तुम्ही काय करता तेही आम्ही बघू,” असा इशाराही त्यांनी दिला.

Manoj Jarange questions Shinde: ‘Why was our certificate cancelled on Shirsat’s advice?’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात