नेते फक्त टीव्हीवर; सोशल मीडियावर मात्र तुकाराम मुंढेंचीच हवा!

विशेष प्रतिनिधी

मुंबई  : महाराष्ट्रातील धडाडीचे आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इन्स्टाग्राम आणि ‘X’वरील फॉलोअर्सची संख्या तसेच पोस्टवर मिळणारा प्रतिसाद पाहता मुंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसारख्या बड्या नेत्यांनाही एंगेजमेंट रेटमध्ये मागे टाकल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढे आघाडीवर

उपलब्ध सोशल मीडिया आकडेवारीनुसार, इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढे यांचे सुमारे ३४ लाख १५ हजार फॉलोअर्स आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुमारे २९ लाख २ हजार, तर एकनाथ शिंदे यांचे सुमारे १३ लाख १ हजार फॉलोअर्स आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या ६० दिवसांतील पोस्टची संख्या पाहिली तर मुंढे यांनी १३ पोस्ट केल्या आहेत. त्याच कालावधीत फडणवीस यांनी ९७, तर एकनाथ शिंदे यांनी २५ पोस्ट केल्या आहेत.

मात्र पोस्टच्या संख्येपेक्षा मिळणारा प्रतिसाद पाहता चित्र वेगळे दिसते. तुकाराम मुंढे यांचा इन्स्टाग्राम एंगेजमेंट रेट २०.३५ टक्के असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचा ०.५० टक्के, तर एकनाथ शिंदे यांचा ०.२४ टक्के एंगेजमेंट रेट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


‘X’वर फॉलोअर्स कमी, पण एंगेजमेंटमध्ये मोठी आघाडी

‘X’ प्लॅटफॉर्मवरील आकडेवारीत मात्र फॉलोअर्सच्या संख्येत राजकीय नेते पुढे आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सुमारे ५.०२ लाख, एकनाथ शिंदे यांचे ३.८७ लाख, तर तुकाराम मुंढे यांचे २.६५ लाख फॉलोअर्स आहेत.

मात्र एंगेजमेंट रेटमध्ये मुंढे पुन्हा आघाडीवर असल्याचे आकडेवारीतून दिसते. तुकाराम मुंढे यांचा एंगेजमेंट रेट ४.६२ टक्के, फडणवीस यांचा ०.०७ टक्के, तर एकनाथ शिंदे यांचा ०.०४ टक्के असल्याचे सांगितले जात आहे.

इतर अधिकाऱ्यांमध्येही मुंढेंचा दबदबा

तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नसल्याचेही या तुलनेत दिसून येते. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत मुंढे यांचे ३४.१५ लाख फॉलोअर्स असून, समीर वानखेडे यांचे ८.४७ लाख आणि विश्वास नांगरे पाटील यांचे ६.१२ लाख फॉलोअर्स असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एंगेजमेंट रेटमध्येही मुंढे आघाडीवर आहेत. त्यांचा एंगेजमेंट रेट २०.३५ टक्के, विश्वास नांगरे पाटील यांचा ३.६० टक्के, तर समीर वानखेडे यांचा ३.२० टक्के असल्याचे आकडेवारीत म्हटले आहे.

तुकाराम मुंढे यांचे अधिकृत व्हेरिफाइड फेसबुक पेज उपलब्ध नसल्याने या प्लॅटफॉर्मवरील त्यांची थेट तुलना करता येत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

फॉलोअर्सपेक्षा एंगेजमेंट महत्त्वाचे

सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता मोजताना केवळ फॉलोअर्सची संख्या पुरेशी ठरत नाही. पोस्टवर किती लोक प्रतिक्रिया देतात, शेअर करतात किंवा इतर प्रकारे सहभागी होतात, हेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते.

तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत कमी पोस्टच्या तुलनेत मिळणारा प्रतिसाद लक्षणीय असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे प्रशासनातील कामाची प्रतिमा आणि सोशल मीडिया लोकप्रियता यांचा अनोखा संगम त्यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे.

आज प्रशासन आणि नागरिकांमधील संवादासाठी सोशल मीडिया हे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या सोशल मीडिया उपस्थितीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, याच डिजिटल एंगेजमेंटमध्ये तुकाराम मुंढे यांनी राजकीय नेते आणि काही लोकप्रिय सनदी अधिकाऱ्यांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

टीप : वरील फॉलोअर्स आणि एंगेजमेंटचे आकडे दिलेल्या सोशल मीडिया विश्लेषणावर आधारित आहेत. सोशल मीडिया आकडेवारी वेळेनुसार बदलू शकते.

Tukaram Mundhe Social Media Reach

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात