Nashik Ghatmatha : नाशिक घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट, संभाजीनगरला यलो अलर्ट; जळगाव-विदर्भातही मुसळधारेचा इशारा

Nashik Ghatmatha

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर :Nashik Ghatmatha  राज्यात सलग ८ व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २४ तासात २७.६, जळगावात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये रिमझिम सुरू होती. मुसळधार पावसामुळे विदर्भ जलमय झाला असून गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार मंडळात (ता. किनवट) अतिवृष्टी झाली.Nashik Ghatmatha

महाराष्ट्रात जून, जुलै महिन्यामध्ये गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी पाऊस यावर्षी पडला आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यात प्रथमच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. २०२२ ते २०२५ या ४ वर्षांत जून, जुलै मिळून राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. यंदा पहिल्या २ महिन्यात सरासरी ५२७.८ मिमीच्या तुलनेत ५०८.७ मिमी पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९६.४ टक्के आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही २ महिन्यात गेल्या ५ वर्षात दुसऱ्यांदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. विभागात ८१.१ टक्के पाऊस झाला. २०२५मध्ये ९२.२ टक्के पाऊस पडला होता. त्यापूर्वीच्या ३ वर्षांत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता.Nashik Ghatmatha



मराठवाड्यात यंदाच्या पहिल्या दोन महिन्यात ८२.१% पाऊस
नाशिक घाटमाथ्यावर आज रेड, संभाजीनगरात यलो अलर्ट
जळगाव, विदर्भात मुसळधार तर संभाजीनगरात जोरदार जलधारा
पैठण : जायकवाडीत ७२ टक्के जलसाठा; ५७,४७३ क्युसेकने पाणी येणे सुरू

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ५७ हजार ४६३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. यामुळे धरणाचा उपयुक्त जलसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला असून, मराठवाड्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.

जायकवाडी धरणातील सध्याची पाणीपातळी १५१६.३१ फूट इतकी झाली आहे. धरणात ५४.६२ टीएमसी (१५४६.७३२ दशलक्ष घनमीटर) इतका जिवंत पाणीसाठा असून एकूण पाणीसाठा ८०.६८ टीएमसी नोंदवण्यात आला आहे. धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ७६.६७ टीएमसी असून त्यापैकी ७२ टक्के साठा भरला आहे. दरम्यान, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांतून विसर्ग सुरूच आहे. गुरुवारी सायंकाळी निळवंडे धरणातून १०,२०९ क्युसेक, तर ओझर वेअरमधून ५,६६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसामुळे 4 गावांचा संपर्क तुटला‎

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सलग‎पावसामुळे पैनगंगा नदीसह परिसरातील सर्वच‎नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे‎पांगरपहाड, आंदबोरी, रेवानाईक तांडा आणि‎अप्पारावपेठ या गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क‎पूर्णपणे तुटला आहे. शेतात व पिकांमध्ये पाणी‎साचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान‎होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.‎प्रशासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना‎सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू केली‎आहे. तसेच ३० जुलै रोजी छत्रपती‎संभाजीनगर, बीड, जालना, हिंगाेली,‎परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत देखील‎पावसाने हजेरी लावली.‎

परभणी जिल्ह्यात १४ मिमी : परभणी‎जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत मध्यम‎स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून,‎जिल्ह्याची सरासरी पावसाची नोंद १४.१‎मिलिमीटर इतकी झाली आहे. जिल्ह्यातील‎पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २७.४ मिमी पाऊस‎झाला. सेलू तालुक्यात सर्वात कमी ७ मिमी‎पावसाची नोंद झाली.तालुकानिहाय झालेल्या‎पावसामध्ये गंगाखेड येथे १६.७ मिमी, जिंतूर‎येथे १६.३ मिमी, पालम येथे १४.६ मिमी,‎परभणी येथे १२.६ मिमी, सोनपेठ येथे १२.५‎मिमी, मानवत येथे ८.८ मिमी आणि पाथरी‎येथे ८.१ मिमी पाऊस झाला. दरम्यान,‎धाराशिव जिल्ह्यात गुरुवारी धाराशिव‎शहरासह आठही तालुक्यांत दिवसभर‎ सूर्यदर्शन झाले नाही. आकाशात दाट ढगांची‎गर्दी होती. दिवसभर पाऊस सुरू होता.यामुळे‎शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले.

Nashik Ghatmatha Red Alert, Sambhaji Nagar Yellow Alert: Heavy Rains Lash Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात