विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘Gunratna Sadavarte नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य ‘तिरंगा रॅली’ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संपूर्ण आंदोलनावर आणि ठाकरे बंधूंवर कडाडून टीका केली आहे.Gunratna Sadavarte
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, हे विद्यार्थ्यांच्या भावना जपणारे सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचारी मेला, तेव्हा आपली शपथ कुठे हरपली होती? भूमिका घेण्यासाठी धैर्य लागते. महाराष्ट्रात टीईटीसारखी घटना घडली होती, ते प्रकरण आता विशेष न्यायालयाकडे गेले आहे. अमित ठाकरे यांनी कोणतीही तक्रार दिली नाही, सरकारने स्वतः कारवाई केली आहे आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे. ठाकरे हे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करण्यासाठी आले आहेत.Gunratna Sadavarte
घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली
पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला, मग दिपकेची जात आडवी आली का? मग नंतर कळले का सोनम वांगचुक यांची जात? ही राजकारणातील रोजबिगारी आहे. आदित्य ठाकरे यांना परत चौथीच्या बोर्डाची परीक्षा देण्यास सांगा. एखादी गोष्ट समजत नसेल तर शिकण्यात काही हरकत नाही. सर्व घरातली मुलं आली होती, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली असतील, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.
तिरंगा रॅलीत बॅनर्सने वेधले लक्ष
‘तिरंगा रॅली’मध्ये तरुणाईचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून, रॅलीत झळकलेल्या अनेक हटके पोस्टर्सनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यात बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासह असलेला ‘कमबॅक करना पडेगा!’ हा ‘जेन झी’ शैलीतील फलक आणि तुकाराम मुंढे व अभिजीत दिपके यांच्या कार्याला दाद देणारा ‘दोन वाघांना सलाम’ हा फलक विशेष चर्चेत राहिला. यासोबतच, “मोदी, तुमच्यापेक्षा जास्त डोकं माझ्याकडे आहे” असा मजकूर लिहिलेला एका चिमुकलीच्या हातातील पोस्टर, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टवरील लक्षवेधी संदेश आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या कोळी बांधवांच्या बँड पथकाने या रॅलीत एक वेगळीच रंगत भरली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App