संघाचा एक मंत्री गेला, संघाचा दुसरा मंत्री आला; कम्युनिस्टांनी फोडला CJP चा फुगा!!

नाशिक : संघाचा एक मंत्री गेला, संघाचा दुसरा मंत्री आला, अशा शब्दांमध्ये कम्युनिस्टांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा फुगा फोडला.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रचंड जल्लोष केला. आंदोलनाचा आणि लोकशाहीचा विजय झाल्याचा मोठा केला. राहुल गांधी यांच्यापासून ते अभिजीत दिपके याच्यापर्यंत सगळ्यांनी भाजपच्या विरोधाचे आणि स्वतःच्या विजयाचे ढोल वाजविले.

– कम्युनिस्टांनी फोडले ढोल

पण कम्युनिस्टांनी विरोधकांच्या विजयाचे ढोल अत्यंत मार्मिक शब्द वापरून फोडून टाकले. याचे कारण केंद्रीय शिक्षण मंत्री पदावर प्रल्हाद जोशी यांचे नियुक्ती झाल्याचे ठरले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्यावर सोपविली. त्यावर माओवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते दिपांकर भट्टाचार्य यांनी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. शिक्षण मंत्री पदावर प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती होणे, हा त्यांचा अतिरिक्त प्रभाव असल्याचे निदर्शक आहे. आधीच त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण, सार्वजनिक पुरवठा, ऊर्जा यांच्यासारखी महत्त्वाची खाती आहेत आणि पंतप्रधानांनी आता त्यांच्याकडे शिक्षण खाते सुद्धा दिले आहे. याचा सरळ अर्थ असा की संघाचा एक मंत्री गेला आणि संघाचा दुसरा मंत्री आला. त्यांना संघाचा अजेंडा राबवायचा असल्याने त्यांनी एक संघाचा मंत्री काढून संघाचा दुसरा मंत्री नेमला, असे दिपांकर भट्टाचार्य म्हणाले.

– राजकीय सत्याची अप्रत्यक्ष कबुली

दिपांकर भट्टाचार्य यांनी राहुल गांधी आणि अभिजीत दिपके यांची नावे घेऊन कुठलीही टीका केली नाही किंवा त्यांचे आंदोलन अयशस्वी झाले, असेही उघडपणे म्हटले नाही, पण संघाचा एक मंत्री गेला आणि संघाचा दुसरा मंत्री आला एवढ्याच निवडक शब्दांमध्ये भट्टाचार्य यांनी राहुल गांधी यांच्यापासून ते अभिजीत दिपके यांच्यापर्यंतच्या नेत्यांच्या विजयाच्या दाव्यांची पोलखोल केली. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे आणि विरोधकांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे संघाने केवळ एक व्यक्ती बदलली पण अजेंडा नाही बदलला. एका व्यक्तीच्या ऐवजी दुसरी व्यक्ती तिथे आणून अजेंडा कायम ठेवला, हेच राजकीय सत्य दिपांकर भट्टाचार्य यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले.

Delhi On the appointment of Pralhad Joshi as the new Union Education Minister, CPI(M-L) leader Dipankar Bhattacharya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात