मोदींचा व्हिडिओतून तिसऱ्यांदा थेट विद्यार्थ्यांशी संवाद; नंदन निलकेणींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ मधून तिसऱ्यांदा विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. नीट पेपर फुटी विरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी मोदींनी व्हिडिओ करून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला होता. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यासाठी व्हिडिओ केला.

त्या पाठोपाठ नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा व्हिडिओ करून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

– उच्चस्तरीय टास्क फोर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हणाले, “भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करत आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी छेडछाड केली, ते आज तुरुंगात सडत पडलेत. सरकारने याआधीच फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली आहेत. तसेच, कठोर कायदेशीर तरतुदींचा समावेश असलेला नवीन कायदा संसदेत आणण्याच्या दिशेनेही आम्ही पावले उचलत आहोत. मात्र, आपल्याला भविष्याचाही विचार करावा लागेल.

आपली परीक्षा प्रणाली विश्वसनीय आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. या सर्व बाबी लक्षात घेऊन, आम्ही जागतिक स्तरावर ख्यातीप्राप्त तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा टास्क फोर्स परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे, आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलली जातील.”

Narendra Modi shares a video and says, “High Powered Task Force on examination

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात