NIA Raids : महाराष्ट्रातील 3 ठिकाणांसह 9 राज्यांत 20 ठिकाणी एनआयएचे एकदाच छापे; ऑनलाइन कट्टरवाद व आरएसएस कार्यालय बॉम्बहल्ल्याच्या तपासाला वेग

NIA Raids

वृत्तसंस्था

मुंबई : NIA Raids देशात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारे ऑनलाइन रॅडिकलायझेशन (कट्टरवादाचा प्रसार) आणि झारखंडमधील रांची येथील १६ जूनच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यालयावरील पेट्रोल बॉम्बहल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी मोठी कारवाई केली. एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील ३ ठिकाणांसह देशातील नऊ राज्यांमध्ये २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.NIA Raids

बॉम्बहल्ल्यातील अटक आरोपी सैफ अन्सारी, अमन अन्सारी आणि सायम सुजन हे दुबईत असताना शाहबाज राणा ऊर्फ ‘भट्टी’ या पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात आले होते. तो ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्थान’ (टीटीएच) या आयएसआय पुरस्कृत संघटनेसाठी काम करतो. या तरुणांना परदेशातून ऑनलाइन सूचना मिळत होत्या त्यांनी हल्ल्याचा व्हिडिओ हँडलरला पाठवला होता.NIA Raids



डिजिटल उपकरणातून सापडले महाराष्ट्र कनेक्शन

विजयवाडा प्रकरणात यापूर्वी अटक केलेला मुख्य आरोपी मोहंमद रहमतुल्ला शरीफ व त्याच्या सहकाऱ्यांकडून जप्त डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी झाली. त्यात आरोपींचा महाराष्ट्रातील काही तरुणांशी ऑनलाइन संपर्क होता हे समोर आले. अशा प्रकारे ते ‘इसिस’ व ‘अल कायदा’ या संघटनांच्या विचारसरणीचा प्रसार करायचे.

NIA Raids 20 Locations Across 9 States Over Online Radicalization and RSS Office Blast

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात