नाशिक : उद्धव ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर आणि शरद पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ दाखवायची भाजपची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये बोलून दाखवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी मदत करणाऱ्या आणि तशी कबुली देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिचे आमदार खासदार फोडायला मात्र दिल्लीतून नकार दिला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार फोडायचा आम्ही कधीही प्रयत्न केला नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताधारी महायुतीमध्ये सामील करवून घ्यायला नकार दिला.
– पवारांच्या नेत्यांना धक्का
महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत, तेच मित्र पक्ष कायम राहतील. त्यामध्ये कुठलीही भर पडणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायला उत्सुक आणि इच्छुक असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या खासदारांना आणि आमदारांना मोठा धक्का बसला. जयंत पाटील, अमोल कोल्हे वगैरे नेत्यांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायचा मोठा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची स्तुती देखील केली होती. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या बरोबरच अन्य नेत्यांची सुद्धा भाजपच्या सत्तेजवळ जाण्याची उताविळी दिसली होती. त्यातच विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या गुप्त भेटीच्या बातमीमुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तेची तहान उघड झाली होती.
– पवारांच्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ
पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या इच्छेवर पाणी फेरले. उद्धव ठाकरेंचे खासदार आणि आमदार फोडायला भाजपने एकनाथ शिंदे यांना मदत केली, अशी जाहीर कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याचाच अर्थ भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर दाखविले होते, पण त्याच भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या इच्छुक आणि उत्सूक नेत्यांना आपल्या सत्तेजवळ फिरकू द्यायला सुद्धा नकार दिला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार फोडणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. याचा अर्थच पवारांच्या आमदार आणि खासदारांना सत्तेचे गाजर मिळणार नाही, मिळायचे तर फक्त मृगजळ मिळेल, हेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App