कुठेच काही जमत नाय म्हणून पवारांच्या पक्षाचे तीन डगरींवर हात पाय!!

नाशिक : कुठेच काही जमत नाय म्हणून पवारांच्या पक्षाचे तीन डगरींवर हात पाय!!, असला प्रकार शरद पवारांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीतून समोर आला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या सहा महिन्यांमधली अवस्था अशीच झालेली दिसली. Sharad Pawar NCP

– काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या पुड्या

अगदी सुरुवातीला शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याची भाषा झाली. त्याचवेळी अजित पवारांबरोबर वाटाघाटी करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायच्या अजित पवारांनी सत्तेच्या बाहेर पडायचे आणि त्यांनाच काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायचे असे ठरल्याच्या पुड्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातल्या नेत्यांनी सोडल्या.

– अजितदादांची राष्ट्रवादी कब्जा घेण्याची खेळी

पण 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांची अकाली एक्झिट झाली आणि त्यानंतर राजकारणाचे सगळे मायनेच बदलले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची कल्पना सोडून दिली आणि अजित पवारांची अख्खी राष्ट्रवादी काँग्रेसच ताब्यात घेण्याची खेळी केली. पण ती खेळी अवघ्या तीन दिवसांमध्ये आटोपली कारण सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे ताब्यात घेतली. त्यामुळे आपोआपच राष्ट्रवादी मधल्या घडामोडींमध्ये भाजपला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. दोन्ही राष्ट्रवादींचे एकीकरण हा विषय शरद पवार किंवा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या हातात शिल्लक राहिला नाही. तो विषय भाजपच्या हातात गेला. भाजपने परवानगी दिली, तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, हे राजकीय सत्य सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आले.



– आमदार – खासदारांची तिहेरी खळबळ

पण त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदार – खासदारांमध्ये अस्वस्थता पसरली. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे ६ खासदार फोडले. भाजपने त्यांना मदत केली, पण भाजपने शरद पवारांचे खासदार फोडायला नकार दिला. एरवी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आठ खासदारांपैकी पाच खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायला इच्छुक आणि उत्सुक असले, तरी भाजपने त्यांना थेट आपल्या गोटात घ्यायला नकार दिला. भाजपने उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सत्तेचे गाजर दाखविले पण शरद पवारांच्या खासदारांना सत्तेचे मृगजळच दाखविले. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिहेरी खळबळ माजली. शरद पवारांचे खासदार भाजपच्या दिशेने ओढले गेले. शरद पवारांचे आमदार भाजपच्या शिंदे सेनेच्या आणि काँग्रेसच्या दिशेने ओढले गेले. विधान परिषद निवडणुकीत याचे प्रत्यंतर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले. सोलापूर जिल्ह्यातले चार आमदार शरद पवारांच्या बरोबर राहिले नसल्याची ती खूण दिसली.

– तीन डगरींवर हात – पाय

त्यातच काल शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये आमदारांची बैठक घेतली त्यामुळे पवार शिष्य संजय राऊत चिडले. शरद पवारांनी गद्दारांना प्रतिष्ठा दिल्याने शरद पवारांची विश्वासार्हता घटल्याचे राजकीय संशोधन त्यांनी केले. पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांची खरी राजकीय फरफट यातून समोर आली. कारण एकीकडे शरद पवारांच्या खासदारांनी भाजपकडे आपला कल असल्याचे स्पष्ट केले होते. दुसरीकडे शरद पवारांच्या काही आमदारांनी भाजप आणि शिंदेसेनेकडे आपला कल असल्याचे दाखवून दिले. त्यासाठी आपापल्या मतदारसंघाची भौगोलिक रचना आणि मराठा मतदारांचा कल याचे दाखले दिले, पण त्याच वेळी सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवारांनी मात्र काँग्रेसकडे आपला कल दाखविला. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष सरळ मार्गाने काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सगळा “डाव” उधळला गेला. शरद पवारांच्या आमदार – खासदारांनी स्वतःहूनच दोन नव्हे, तर तीन डगरींवर हात पाय ठेवले. पण एवढे करूनही शरद पवारांना हवे ते राजकारण साध्य होऊ शकले नाही. शरद पवारांना सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व आपल्या खंडित राष्ट्रवादीत सुद्धा प्रस्थापित करता आले नाही. आपली उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस विखंडित (fragment) होताना त्यांना पाहावी लागली.

Sharad Pawar NCP will be fragmented into three parts

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात