Patel and Tatkare : पटेल-तटकरे आमचेच नेते, पक्षात कोणतेही मतभेद नाहीत; दिल्ली कार्यालयात कोणालाही रोखले नाही, अविनाश आदिकांचे स्पष्टीकरण

Patel and Tatkare

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Patel and Tatkare सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना अखेर पक्षाने पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या, तसेच प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेश नाकारल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार खंडन केले आहे. मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत अशा बातम्या देणाऱ्या संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.Patel and Tatkare

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज या दोन्ही नेत्यांच्या एका जवळच्या नेत्याला दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रोखून धरण्यात आल्याची घटना घडली आहे. या नेत्याला पक्षाविषयी गैरसमज न पसरवण्याची कथित तंबीही देण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहेPatel and Tatkare



नेमके काय म्हणाले अविनाश आदिक?

पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश आदिक म्हणाले, “मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव असून दिल्लीतील कार्यालयाचे कामकाज पाहतो. गेल्या काही आठवड्यांच्या खंडानंतर मी कालच दिल्ली कार्यालयात गेलो होतो. मात्र, एका वृत्तपत्राने माझ्या नावाने अत्यंत चुकीची आणि खोडसाळ बातमी छापली. मी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्ली कार्यालयात येण्यास बंदी घातल्याचा दावा या बातमीत केला होता. हा सर्व प्रकार माझ्या आणि पक्षाच्या विरोधात जाणीवपूर्वक रचलेला कट आहे. आम्ही कायदेशीर सल्ला घेत असून संबंधित वृत्तपत्रावर लवकरच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत.”

तटकरे-पटेल हेच आमचे नेते – उमेश पाटील

पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील अंतर्गत वादाचे वृत्त फेटाळून लावले. “सुनील तटकरे हेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहतील. तसेच प्रफुल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. पक्षाची नवी राष्ट्रीय कमिटी नुकतीच जाहीर झाली असून, आगामी काळातील सर्व संघटनात्मक निर्णय ही कमिटीच घेईल. त्यामुळे माध्यमांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी केले.

उमेश पाटलांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप

यावेळी उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि वैयक्तिक पातळीवर आरोप केले. “रोहित पवार हे राजकीय फायद्यासाठी अजित पवार यांच्या नावाचा वापर करत असून त्यांनीच दादांचा सर्वाधिक छळ केला आहे. बारामती ही अजितदादांची राजकीय राजधानी आहे, मात्र रोहित पवारांचा डोळा आता बारामतीवर आहे,” असा घणाघात पाटील यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, “अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवार केवळ राजकारण करत असून दादांची राजकीय ‘लीगसी’ (वारसा) हिरावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये. शरद पवार गटातील अनेक आमदार आणि खासदार आजही अजितदादांच्या संपर्कात असून आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत, मात्र आम्ही अद्याप त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतलेला नाही,” असा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.

Patel and Tatkare Are Our Leaders, No Internal Rift in NCP: Avinash Adik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात