भारत – अमेरिका मुक्त व्यापार करार मैत्रीचा एक नवीन अध्याय!!; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार झाला. गेली सुमारे दीड वर्षे भिजत पडलेले घोंगडे अखेर धुतले गेले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरचे टेरिफ कमी केले. त्यामुळे दोन्ही बाजूंमधला संघर्ष कमी व्हायला मदत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संयम दाखवून भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार व्हायला मोकळीक दिली. या महत्त्वपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार झाला.India-US Free Trade Agreement a new chapter in friendship!!; Praised by Devendra Fadnavis



यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करणारे ट्विट केले.

फडणवीसांचे ट्विट असे :

भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.

जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत – अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल.

महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल.

India-US Free Trade Agreement a new chapter in friendship!!; Praised by Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात