विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करून एका वयोवृद्ध वकिलाने त्यांच्यावर बूटाने हल्ला करायचा प्रयत्न केला. त्यामुळे आज दिवसभर राजकीय वर्तुळाचे चर्चेचा विषय ठरला.Insult to Sanatan; Elderly lawyer’s attempt to attack Chief Justice Bhushan Gavai;
सर न्यायाधीश भूषण गवई यांनी खजूराहो मधल्या मंदिरातल्या विष्णू मूर्तीच्या रेस्टोरेशन संदर्भात विशिष्ट टिपणी केली होती. त्यांनी संबंधित याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळताना तुम्हाला जर विष्णू मूर्तीचे रिस्टोरेशन हवे असेल तर तुम्ही त्यालाच प्रार्थना करा असे म्हटले होते तुम्ही केवळ प्रसिद्धीसाठी याचिका केल्याचे त्यांनी याचिकाकर्त्याला सांगितले होते.
मात्र सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर देशभरात वाद उफाळला त्यांनी सनातन धर्मियांच्या श्रद्धेचा अपमान केला, असा आरोप झाला त्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी खुलासा केला आपण सर्व धर्मांचा आदर करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
परंतु या सर्व वादाला काही विशिष्ट काळ लोटल्यानंतर आज राकेश भूषण नावाच्या 71 वर्षांच्या वयोवृद्ध वकिलाने सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर सुनावणीच्या वेळी बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षारक्षकांनी वेळीच आवरले स्वतः सरन्यायाधीशांनी सुद्धा त्या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आणि आपण असल्या प्रकारांनी विचलित होणार नाही असे सांगितले. यादरम्यान वयोवृद्ध वकील राकेश भूषण यांनी सनातनचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
– शरद पवारांकडून निषेध
आजच्या घटनेवर देशभर चर्चा सुरू झाली त्यावेळी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. देशभरात गेल्या अकरा वर्षांमध्ये जे विष पेरले गेले त्यातून आजचा प्रकार घडल्याचे शरद पवारांनी ट्वीट केले. सरन्यायाधीशांवर हल्ला होणे हा देशाचा संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे तो सहन केला जाणार नाही. आपण राज्यघटनेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केले. कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App