विशेष प्रतिनिधी
फलटण : Ramraje Warns मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना दिला आहे.Ramraje Warns
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघांच्याही मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले होते.Ramraje Warns
व्यासपीठावर दोघे एकत्र असताना दोघांनी एकमेकांसोबत बोलणे टाळले होते. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या भाषणात रणजीत निंबाळकर आणि माझे भांडण आहे म्हणजे आम्ही एकमेकांची कॉलर पकडायची का? दोघांनाही कुठे थांबायचे हे चांगले समजते. मतभेद असले तरच लोकशाही टिकते. हे वैयक्तिक भांडण नाही ज्याला त्याला आपली मते आहेत ते आपण मांडत असतो असे यावेळी ते म्हणाले होते. मात्र त्यानंतर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात रामराजे यांच्या विषयी बोलणे टाळले होते.
वरिष्ठांनी सांगितलं तर होईल. नाहीतर हे मनोमिलन होणार नाही. हा निर्णय लोकांच्या हातात आहे लोक ठरवतील, अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे यांनी मनोमिलनाचा चेंडू रणजीत नाईक निंबाळकर यांच्या कडे टोलवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App