कोलकात्यातील विधी विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची सुओ मोटो दखल, पोलीस आयुक्तांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

NCW

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : कोलकात्यातील एका नामांकित विधी महाविद्यालयात अमानुष घटना उघडकीस आली असून एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवारातच सामूहिक बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दोघे सध्याचे विद्यार्थी आणि एक माजी विद्यार्थी, जे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्य असल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोलकाता पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तत्काळ आणि कठोर तपासाचे आदेश दिले आहेत. NCW

भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित तरतुदींनुसार वेळेच्या चौकटीत कारवाई करावी आणि ३ दिवसांत तपशीलवार कारवाई अहवाल सादर करावा, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर पीडितेला वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत तत्काळ उपलब्ध करून द्यावी. भारतीय न्याय संहिता (BNSS) कलम 396 अंतर्गत राज्य सरकारने भरपाई द्यावी. सुरक्षा व्यवस्थेचा अभाव प्रकर्षाने दिसून येत असल्याने महाविद्यालय प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. NCW



२५ जून रोजी, कोलकाता लॉ कॉलेजच्या २४ वर्षीय विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार केली होती. कॉलेजचा माजी विद्यार्थी मनोजित मिश्रा, आणि सध्याचे विद्यार्थी झैब अहमद आणि प्रमित मुखोपाध्याय यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. मनोजितने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी कोलकाता येथून तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर बीएनएसच्या कलम १२७(२)/७०(१)/३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ जून रोजी कोलकाताच्या अलीपूर न्यायालयाने तिन्ही आरोपींना १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींच्या मोबाइल फोनवरून बलात्काराचे व्हिडिओदेखील सापडले आहेत. हे तिन्ही आरोपी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत.

महाविद्यालयाच्या गार्ड रूममध्ये बलात्काराचा प्रकार घडला. माझ्यावर बलात्कार करताना त्याने माझे व्हिडिओ बनवले आणि मला ब्लॅकमेल केले. प्रमीत आणि झैद हे सर्व पाहत होते. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनोजितने मला हॉकी स्टिकने मारहाण केली. मी रात्री १० वाजता खोलीतून बाहेर पडू शकले. बाहेर येताच मी माझ्या वडिलांना फोन करून संपूर्ण कहाणी सांगितली, असे या विद्यार्थिनीने सांगितले.

NCW takes suo moto cognizance of the gang rape case of a law student in Kolkata

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात